हातात सामान, चेहऱ्यावर राग, अचानक बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली 'ही' बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री नुकतीच या अभिनेत्याच्या घरी स्पॉट झाली. 

Updated: Jan 10, 2022, 02:11 PM IST
 हातात सामान, चेहऱ्यावर राग, अचानक बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली 'ही' बॉलिवूड अभिनेत्री title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी नुकतीच सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी स्पॉट झाली. यादरम्यानचे सिद्धार्थ मल्होत्राच्या घराबाहेरील कियारा अडवाणीचे काही खास  फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत अशी चर्चा आहे. आता सिद्धार्थच्या घराबाहेर अभिनेत्रीला स्पॉट केल्यानंतर या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. 

पापाराझींना पाहून नेहमी हसणारी आणि पोझ देणारी कियारा अडवाणी यावेळी मात्र कॅमेरापासून लांब रहाताना दिसली. समोर आलेल्या फोटोंमध्ये तुम्ही बघू शकता की, कियारा अडवाणी यावेळी थोडी रागात दिसत होती. तिच्या हातात एक बॅग आणि काही वस्तूंचे पॅकेट देखील दिसत आहेत.

कारमधून उतरल्यानंतर कियारा अडवाणी थेट सिद्धार्थ मल्होत्राच्या बिल्डिंगमध्ये गेली. कियारा अडवाणीने यावेळी पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यासोबत कियारा अडवाणीने फ्लॅट फूटवेअर आणि सनग्लासेससह हा लूक परिपूर्ण केला आहे.

मास्क आणि सनग्लासेसने झाकलेला कियारा अडवाणीने चेहरा एकही व्यवस्थित फोटो पापाराझींना दिला नाही. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्यातील नात्याबद्दलची चर्चा बर्‍याच दिवसांपासून कायम आहेत. तरीही दोघांनीही त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही.