Kirti Kalhari On Being Assumed Lesbian : बॉलिवूड अभिनेत्री कीर्ती कुल्हारी सध्या तिच्या 'हिसाब बराबर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच, कीर्तीने एका मुलाखतीत तिचे केस लहान करण्याबद्दल सांगितले. तिच्या या लूकचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या फोटोंच्या पोस्ट खाली कीर्ति लेस्बियन असल्याच म्हणण्यत येत होतं. नक्की हा काय प्रकार आहे?
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, कीर्तीला विचारण्यात आले की जेव्हा तू केस कापून अतिशय लहान केलेस तेव्हा तुला कशी प्रतिक्रिया मिळाली. नकारात्मक की सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. यावर, अभिनेत्रीने प्रथम सकारात्मक कमेंट्सबद्दल सांगितले. कीर्ती म्हणाली, “जेव्हा मी माझे केस कापले तेव्हा मला डीएम आणि मेसेज येऊ लागले. या काळात, मला एका किशोरवयीन मुलीच्या वडिलांचा निरोप आला की, माझ्या मुलीला थेट अशाच पद्धतीचे केस कापायचे आहेत. मला आश्चर्य वाटले आणि मला वाटले की मी फक्त एक छोटीशी गोष्ट केली जी मला समजली, ट्रेंड सुरू करण्यासाठी नाही तर मला ती करायची होती किंवा मला तसं राहायचं होतं.
'हिसाब बराबर' च्या शेवटच्या शूटनंतर, मला वाटले की, माझे केस खूप रंगले आहेत आणि मी ते कापले पाहिजेत. यानंतर, मला अनेक महिलांकडून मॅसेज आले आणि त्या माझ्या कृतीने खूप प्रेरित झाल्यासारखे वाटले. कीर्ती पुढे म्हणाली की, केसांबाबत लोकांवर खूप दबाव असतो, सामाजिक दबाव असतो, कौटुंबिक दबाव असतो. इंडस्ट्रीत असल्याने आणि एक अभिनेत्री असल्याने, माझे केस कापणे हे माझ्यासाठी खूप धाडसी काम आहे.
कीर्तीने पुढे सांगितले की तिला नकारात्मक कमेंट्सही मिळाल्या. लोकांना असं वाटायचं की, मी केस कापले म्हणून मी लेस्बियन आहे. लोक विचार करू लागले की मी लवकरच हे जाहीर करेन. तर, जर माझे केस लांब असतील तर मी लेस्बियन नाही, पण मी ते कापताच, तुम्ही गृहीत धरता की मी समलैंगिक आहे? कारण एखाद्या व्यक्तीबद्दल तुमचा समलैंगिक असल्याचा आभास ती तिची केशरचना कशी ठेवते यावर अवलंबून असतो. लोक तुमच्या कामाकडे त्यांच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने पाहतात ते पाहून मला खूप आश्चर्य वाटले.”
कीर्ति कुल्हारीने 2010 मध्ये खिचडी या सिनेमातून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. पिंक या सिनेमातून कीर्तिला ओळख मिळाली. शैतान, उरी आणि मिशन मंगल सिनेमातही दिसली. त्यानंतर फोर मोर शॉट्स प्लीजमधून वेगळी ओळख निर्माण केली आता कीर्ति हिसाब बराबरमध्ये आर माधवन आणि नील नितीन मुकेशसोबत दिसत आहे.