Kedarnath yatra 2025: हिंदू धर्मानुसार चारधाम यात्रेला खूप महत्त्व आहे. हिंदू पौराणिक ग्रंथानुसार पवित्र तीर्थयात्रेपैकी चारधाम यात्रा ही एक अतिशय पवित्र तीर्थ यात्रा आहे. जवळपास सहा महिने चार धाम यात्रा सुरू असते. या सहा महिन्यात लाखो भाविक दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचतात. याला छोटी चार धाम यात्रा असंही म्हणतात.
आदी शंकराचार्य यांनी हजारो वर्षांपूर्वी चार पवित्र तीर्थस्थळे स्थापित केली आणि त्या तीर्थस्थळांचे दर्शन म्हणजेच चारधाम यात्रा. आत्ता सुरु होत असलेली यात्रा उत्तराखंडमधील चार धामांची आहे. गेल्या काही वर्षांत तरुणांमधील चार धाम यात्रेची लोकप्रियता वेगाने वाढत आहे.
30 एप्रिल 2025 रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दार उघडले जातील, याच दिवशी चारधाम यात्रेची सुरुवात होईल. त्यानंतर 4 मे 2025 रोजी बद्रीनाथ धाम उघडले जाईल. केदारनाथ धामचे कपाट उघडण्याची तारीख महाशिवरात्रीच्या दिवशी जाहीर केली जाईल.
उत्तराखंड प्रशासनाने यात्रा मार्गावर आवश्यक सुविधा 15 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित विभागांनी दिलेल्या वेळेत काम पूर्ण न केल्यास जबाबदारी ठरवली जाईल. यात्रेच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने खास सुरक्षा यंत्रणा उभारली आहे. प्रत्येक 10 किमी अंतरावर चीता पोलिस गस्त घालतील. चारही धामांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल ठेवण्यात आले आहे. एवढेच नाही तर ही ठिकाणे खूप संवेदनशील वातावरणाची असल्यामुळे गेल्या काही वर्षांत त्याची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. त्याशिवाय मोबाइल नेटवर्क मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. गोरगरीब यात्रेकरूंना मोफत भोजन आणि निवासाची सोय केली जाईल.
यावर्षीचा चारधाम यात्रेबाबत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे चारधाम यात्रेमध्ये पहिल्या एक महिन्यासाठी VIP दर्शन बंद राहणार आहे. सर्व यात्रेकरूंना समान नियम लागू असतील.
हे ही वाचा :Horoscope : 4 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, कठीण बाबींवर कराल मात
चारधाम यात्रेची सुरुवात हरिद्वार येथून होते. त्यानंतर यात्रेकरू यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि शेवटी बद्रीनाथ येथे जातात. यंदा अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित यात्रा अनुभवण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. तर मग वाट कशाची पाहताय, लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करा आणि यात्रेसाठी सज्ज व्हा!
55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले लोक ज्यांना हृदयविकार, अस्थमा, हाय ब्लड प्रेशर, मधुमेह आहे त्यांनी चारधाम यात्रेला जाताना काळजी घ्यावी. तसंच, गर्भवती महिलेने डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि हेल्थ चेकअप करूनच चार धाम यात्रेला जावे.