नवी दिल्ली : आधार नंबर बॅंक खात्याशी लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबर शेवटची तारीख आहे.
सरकारने ठरवेली मुदत या दिवशी संपणार आहे. त्यामूळे आधार लिंक करताना काय चूक टाळावी याबद्दल माहिती हवी.
३१ डिसेंबर २०१७ पर्यंत बॅंक खात्याशी आधार नंबर जोडला नाही तर खाते बंद होऊ शकते.
त्यामूळे बहुतांश जणांनी ही प्रोसिजर केली पण आधार लिंकिंग फेल होण्याची बरीच प्रकरणे समोर आली आहेत.
बॅक खाते आणि सद्याची माहिती मॅच होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामूळे नक्की कोणती माहिती मॅच होत नाहीए हे जाणून घ्यायला हवे.
आधार कार्ड आणि बॅंक अकाऊंटवरची नावे वेगवेगळी असतील तर आधार अकाऊंटशी लिंक होणार नाही.
बॅंक खात्यातील अकाऊंट बर्थ डे डिटेल्स आधार कार्डवर लिहिलेल्या डिटेल्सशी मॅच होत नसेल तर अडचण येईल.
तुमच्या घरचा पत्ता वेगवेगळा लिहिलेला आढळल्यासही तुम्हाला अडचण येऊ शकते.
आधार डिटेल्समध्ये चूका असतील तर सुधारण्यासाठी आधार डिटेल्स करेक्शन फॉर्म भरावा लागेल.
आधारमध्ये पत्ता चुकीचा असेल तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरून तो सूधारला जाऊ शकतो. पण बाकीच्या डिटेल्स करेक्शनसाठी तुम्हाला आधार सेंटर ला जावे लागेल.
जर बॅंक खात्यातील माहिती चूकीची असेल तर बॅंकेत जाऊन खात्याची माहिती सुधारून घ्यावी लागेल. यासाठीदेखील एक फॉर्म भरावा लागेल.
सर्वोच्च न्यायालयात आधार कार्ड पॅनकार्डला लिंक करण्याविषयी काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सरकारला ही मुदत वाढवण्याविषयी सूचना केली होती, त्यानुसार सरकारने ही तयारी दाखवत ही मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवून दिली जाण्याची शक्यता आहे.