Govinda's second wife : बॉलिवूड अभिनेता गोविंदाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. कधी त्याचे चित्रपट मोठ्या पडद्यावर तुफान कमाई करायचे. त्याच्या डान्सचे तर लाखो चाहते आहेत. इतकंच नाही तर त्यानं कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. आजकाल गोविंदा रिअॅलिटी शोमध्ये अनेकदा दिसतो. नुकत्याच एका दिवाळी पार्टीत पोहोचलेल्या गोविंदानं काही खास फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत त्यानं त्याच्या दुसऱ्या पत्नीविषयी खुलासा केला आहे. आता गोविंदाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायराल होतोय. त्यामुळे सगळीकडे चांगलीच चर्चा सुरु आहे.
गोविंदानं 80 ते 90 च्या दशकात त्याच्या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. गोविंदाचा जन्म हा 21 डिसेंबर 1963 रोजी झाला होता. गोविंदाचे वडील अरुण देखील अभिनेता होते आणि त्याची आई निर्मला देवी गायिका आणि अभिनेत्री होत्या. कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर गोविंदानं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इल्जाम’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. गोविंदानं सुनीता आहुजाशी 1987 मध्ये लग्न केलं. त्यांना 2 मुलं आहेत.
सध्या बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्टी सुरु आहे. गोविंदानं नुकतीच डेव्हिड धवन यांच्या पार्टीत हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये असलेल्या वादाविषयी अनेक चर्चा सुरु होत्या. या पार्टीनंतर गोविंदानं डेव्हिड धवनसोबत एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं की 80 आणि 90 च्या दशकात माझ्या दोन पत्नी होत्या. एक सुनीता आणि दुसरा डेव्हिड. गोविंदाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. वरुण धवनपासून सिद्धांत चतुर्वेदीपर्यंत सगळ्यांनी त्याच्या या पोस्टवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. त्यासोबत नेटकऱ्यांनी कमेंट करत ते दोघं पुन्हा एकत्र येणार या गोष्टीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा : सलमान खानला सर्वात मोठा झटका, 'टायगर 3' वर 'या' देशांनी घातली बंदी!
गोविंदानं पत्नी सुनीता आहूजासोबत एक फोटो शेअर केला आहे. त्याच्यासोबत त्यानं सांगितलं की सुनीता यांनी काळ्या रंगाचा आऊटफिट परिधान करण्याचा सल्ला दिला होता. गोविंदा आणि डेव्हिड धवन विषयी बोलायचे झाले तर ‘शोला और शबनम’, ‘राजा बाबू’, ‘कुली न. 1’, ‘हीरो न. 1’ आणि ‘पार्टनर’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले. पण काही कारणांंमुळे त्यांच्याच दुरावा निर्माण झाला आहे.