खळखळून हसवणाऱ्या Kushal Badrike ला 'या' आगळ्या वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक

Kushal Badrike In Negative Role : लोकप्रिय मराठी कॉमेडियन कुशल बद्रिके लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कुशल एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षक आता कुशलला या भूमिकेत पाहण्यासाठी उस्तुक आहेत. दरम्यान, त्याच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 10, 2023, 06:30 PM IST
खळखळून हसवणाऱ्या Kushal Badrike ला 'या' आगळ्या वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक title=
(Photo Credit : Kushal Badrike Instagram)

Kushal Badrike In Negative Role : लोकप्रिय मराठी कॉमेडीयन आणि अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा नेहमीच प्रेक्षकांना त्यांच्या विनोदांनी खळखळून हसवणून सोडतो. कुशल बद्रिके चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांना हसवतो. त्याची विनोदाची टायमिंग ही सगळ्यांना प्रचंड आवडते. दरम्यान, आता सगळ्यांना खळखळून हसवणारा कुशल आता सगळ्यांना खलनायकाच्या भूमिकेत भेटायला येणार आहे. त्याच्या या नव्या चित्रपटाविषयी कुशलनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत घोषणा केली आहे. त्यानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यावर त्याचे चाहते प्रतिक्रिया देखील करत आहेत. 

कुशल बद्रिकेनं हे पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये कुशल एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. खरंतर कुशल हा ‘रावरंभा’ (Ravrambha) या ऐतिहासिक चित्रपटात क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ ही भूमिका साकारणार आहे. कॉमेडीनंतर आता नकारात्मक भूमिकेमध्ये त्याला पाहण्यासाठी कुशलचे चाहते आतुर आहेत. दरम्यान, या पोस्टमध्ये तो पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या भूमिकेविषयी कुशल म्हणाला, 'बहलोलखानचा वफादार आणि शाही सल्तनतीचा राखणदार असलेला ‘कुरबतखान’ हा विजापूरचा क्रूर हेर होता. बघणाऱ्याला चीड येईल अशी ही भूमिका साकारणं हे खरंतर माझ्यातल्या अभिनेत्यासाठी आव्हानात्मक होतं. त्यामुळे दिसण्यातला वेगळेपणा आणि लकबी आत्मसात करून ही भूमिका मी साकारली आहे. ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल, अशी मला खात्री आहे.' 

हेही वाचा : VIDEO : वयाच्या 66 वर्षी Anil Kapoor यांनी मायनस डिग्रीमध्ये केलं वर्कआऊट!

कुशल ब्रदिके यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'कुरबुतर खान नाही कबुतर खान वाटतो... तुम्ही कीती ही सीरियसली अभिनय केला तरी तुम्हाला पाहिल तरी हसायला येते भाऊ.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तुला या भूमिकेत पाहण्यासाठी उस्तुक आहे. '

दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती शशिकांत पवार यांनी केलं आहे. या चित्रपटाची सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत तर कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. तर छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक, रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे,  कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे. साहसदृश्ये शेवोलिन मलेश यांची आहेत. व्हीएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापूरे यांनी सांभाळली आहे. ध्वनीसंकलन दिनेश उच्चील, शंतनू अकेरकर यांचे आहे. प्रशांत नलवडे निर्मिती व्यवस्थापक आहेत. 12 मे ला 'रावरंभा' ही ऐतिहासिक प्रेमकहाणी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.