मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आमिर खानचा सिनेमाच्या बाबतीत वाईट टप्पा सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर आमिर खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट लाल सिंग चड्ढा फ्लॉप ठरला आणि आता बातमी येत आहे की प्रसिद्ध गायक गुलशन कुमारचा बायोपिक चित्रपट मोगलमधूनही आमिरचा पत्ता कट करण्यात आला आहे. लाल सिंग चड्ढाने आमिर खानच्या करिअरवर खूप प्रभाव टाकला आहे. अशी माहिती आहे.
या सिनेमातून आमिरचा पत्ता कट
हे लक्षात घेण्यासारखं आहे की, टी-सीरीजचे मालक गुलशन कुमार यांच्या मोगल या बायोपिक चित्रपटाबाबत आमिर खानच्या नावाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. या चित्रपटात आमिर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण ई टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, आमिर यापुढे या चित्रपटाचा भाग नसल्याचा दावा केला जात आहे. बातम्यांनुसार, आमिर खान टी-सीरीजचे मालक भूषण कुमारसोबत या मोठ्या प्रोजेक्टवर काम करणार होता. पण 2 वर्षांपूर्वी त्याने वैयक्तिक कारणांमुळे या चित्रपटाला नकार दिला होता.
मात्र, सध्याच्या युगात लाल सिंग चड्ढा फ्लॉप झाल्यानंतर आमिरच्या हातून अनेक चित्रपट निघत असल्याची अफवा जोर धरू लागली आहे. आमिरच्या आधी गुलशन कुमारचा बायोपिक मोगल बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला ऑफर करण्यात आला होता.
आमिरचा पुढचा चित्रपट कोणता?
आमिर खानच्या पुढील चित्रपटाबाबत चर्चा होत असताना, त्यात अजून बराच वेळ शिल्लक आहे. कारण आमिर वर्षांनंतर त्याच्याच शैलीत चित्रपट घेऊन येतोय. 4 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आमिर खानचा लाल सिंग चड्ढा आला, पण हा चित्रपट कमाल दाखवू शकला नाही. आता येत्या काळात आमिर खान कॅम्पियन्स या स्पॅनिश चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात आमिरसोबत बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.