Malayalam Actor Innocent Dies: गेल्या अनेक दिवसांपासून मनोरंजन विश्वातून सातत्याने दु: खद बातम्या येत आहेत. काल (26 मार्च) ला प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आकांशा दुबे (Akanksha Dubey) हीने बनारसमध्ये एका हॉटेल रुममध्ये (Hotel room) गळफास घेत आत्महत्या केली. 25 वर्षाच्या आकांक्षाने टोकाचं पाऊल उचलल्याने सध्या मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय नेते आणि अभिनेते इनोसंट वरीद थेककेथला (Actor Innocent Dies) याचं कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचे रुग्ण (corona update) झपाट्याने वाढत आहेत. यात गेल्या 24 तासांत महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात प्रत्येकी दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू ओढवला आहे. अशातच माजी खासदार आणि मल्याळम अभिनेते इनोसंट वरीद थेककेथला (75) याचं कोरोनामुळे निधन झाले आहे. केरळमध्ये एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना, श्वास घेण्यास त्रात होत होता. तसेच त्यांचे काही अवयव निकामी झाले होते, त्यामुळे त्याचं निधन झाल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली आहे.
वाचा : सोन्याचे दर 'जैसे थे', तर चांदी किचिंत महाग, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर
अभिनेत्यासोबतच मासूम हे माजी खासदारही राहिले आहेत. ते AMMA (असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट) चे अध्यक्षही राहिले आहेत. हा अभिनेता निरागस कॉमेडीचा माहिर होता आणि त्यांनी आपल्या पात्रांच्या माध्यमातून विनोदी भूमिकांना वेगळे वळण देऊन लोकांना गुदगुल्या करण्यात माहीर असल्याचे सिद्ध केले.
कॉमेडी व्यतिरिक्त इनोसंटने अनेक वेगवेगळ्या ड्रामा चित्रपटांमध्ये इतर अनेक शैलींचा प्रयत्न केला. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत इनोसंटची एंट्री 1972 मध्ये नृत्यशाला या चित्रपटातून झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन एबी राज यांनी केले होते. हळूहळू इनोसंटने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आणि मल्याळम चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले.