मोठे डोळे, चमकदार सौंदर्य, दमदार आवाज आणि अभिनयाने बॉलिवूडवर छाप सोडणारा अभिनेता शम्मी कपूर हा एक मनमोकळ्या पणाने मस्ती करणारा अभिनेता होता. शम्मी कपूरने 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्याला रोमँटिक चित्रपटांचा बादशाह म्हणून ओळखले जात होते. अनेक मुली अभिनेता शम्मी कपूरच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी मुली काहीही करायला तयार होत्या.
मात्र, अभिनेता शम्मी कपूरचे ह्रदय हे फक्त एका खास व्यक्तीसाठी धडकत होते. परंतु, जेव्हा अभिनेत्याने त्या अभिनेत्रीला लग्नाचा प्रस्ताव पाठवला तेव्हा तिने थेट अभिनेत्याला लग्नासाठी नकार दिला. हे पाहून शम्मी कपूरचे ह्रदय तुटले. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घेऊयात सविस्तर
शम्मी कपूरला आवडायची ही अभिनेत्री
अभिनेता शम्मी कपूरचे लाखो चाहते होते. तो त्याच्या रोमँटिक अंदाजामुळे ओळखला जायचा. त्याने हजारो मुलींच्या ह्रदयात घर केले होते. त्याला 'याहू बॉय' म्हणून ओळखले जायचे. परंतु, अभिनेत्याचे ह्रदय अभिनेत्री मुमताजसाठी धडकायचे. अभिनेत्रीचे देखील शम्मी कपूरवर प्रेम होते. पण जेव्हा अभिनेता शम्मी कपूरने तिला लग्नाचा प्रस्ताव पाठवला तेव्हा तिने थेट नकार दिला. या प्रस्तावामध्ये अभिनेत्याने एक अट ठेवली होती. ज्यामुळे मुमताज नाराज होती.
मुमताजने का नाकारला लग्नाचा प्रस्ताव?
मुमताजने शम्मी कपूरचे ह्रदय का तोडले, याचा खुलासा अभिनेत्रीने 2011 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने शम्मी कपूर आणि तिच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले. 'ब्रह्मचारी' चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी अभिनेत्याने तिला प्रपोज केले होते. त्यावेळी अभिनेत्याने तो नकार दिला होता. कारण अभिनेत्याला वाटायचे की मी करिअर सोडावं. कारण त्यावेळी कपूर घराण्यातील महिला काम करत नव्हत्या. शम्मी कपूरला त्यावेळी त्याच्या कुटुंबाच्या इच्छेचा आदर करावा लागला आणि मला माझ्या करिअरचा आदर करावा लागला. असं अभिनेत्री मुमताजने सांगितले.
नकार देताच शम्मी कपूरने घेतला होता मोठा निर्णय
मुमताज पुढे म्हणाली की, मी आणखी काय करू शकले असते? मला माझ्या कुटुंबाचीही काळजी घ्यावी लागली. त्यावेळी मला 8 लाख रुपये मिळत होते. त्या काळातील सर्वात कमी मानधन घेणारी अभिनेत्री मी होते. त्यावेळी माझ्या निर्णयाने शम्मी कपूरला प्रचंड वाईट वाटले होते. त्यानंतर त्याने ठरवले की तो कधीही कोणत्याही अभिनेत्रीशी लग्न करणार नाही. या निर्णयामुळे त्याने 1974 मध्ये नीला देवीशी लग्न केले.