Kangana Ranut on Rahul Gandhi : अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत गेल्या अनेक दिवसांपासून तिचा आगामी चित्रपट 'एमरजेंसी' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र होती. सेंसर सर्टिफिकेट आणि शीख समुदायाला खोट्या किंवा चुकीच्या पद्धतीनं दाखवत असल्याच्या आरोपांनंतर आता अखेर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. एका मुलाखतीत कंगनानं संसदमध्ये कॉंग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीविषयी सांगितलं. त्यासोबत हे देखील सांगितलं की राहुल गांधी यांच्या या सगळ्यावर काय प्रतिक्रिया होती.
कंगना रणौतला प्रियांका गांधी यांच्याशी झालेल्या भेटीविषयी प्रश्न विचारण्यात आला. जिथे त्यांनी चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. त्यांनी म्हटलं की "मी नुकताच त्याचा उल्लेख केला होता. त्याचं कारण म्हणजे हा सगळ्यात मोठा विषय ठरला होता. त्यामुळे मला याला योग्य ती माहिती घेत रेकॉर्डवर ठेवायचं होतं. त्या संसदेतील एक महत्त्वाची व्यक्ती आणि एक महिला आहेत. मला फक्त इतकं सांगायचं आहे की त्या खूप दयाळू आहेत. त्यांचे भाऊ (राहुल गांधी) पेक्षा जास्त. जेव्हा आम्ही संसदेत होतो. ती चालत होती आणि मी कोणाला हळूच आवाजात बोलताना ऐकलं की अरे देवा, तिचे सुंदर केस बघ. मी पाठी वळून पाहिलं तर त्या प्रियांका गांधी दिसल्या."
कंगनानं टाइम्स नाउला पुढे सांगितलं, "त्यांनी विचारलं की संसदेत मला कशी वागणूक देण्यात आली आणि मी त्यांना सांगितलं की हे खरंच खूप मनोरंजक होतं आणि माझ्या मूळ स्वभावापेक्षा पूर्ण वेगळं आहे. मी त्यांना म्हणाले की 'मी तुमची आजी इंदिरा गांधींवर चित्रपट बनवतेय. त्या थोड्या विचारत पडला. मी म्हणाले त्याचं नाव 'एमरजेंसी' आहे आणि मला वाटतं तुम्हाला तो चित्रपट पाहायचा असेल. त्या म्हणाल्या की मी तुम्हाला एमरजेंसी विषयी अशा गोष्टी सांगू शकते ज्या विषयी तुला माहित नसेल."
पुढे कंगना म्हणाली, "मी त्यांना म्हणाले की त्यांनी मला मी बनवलेला चित्रपट दाखवण्याची संधी द्यावी आणि पाहावी की त्याविषयी त्या काय विचार करतात. त्याविषयी आणखी माहिती देण्यासाठी त्यांनी कॅथरीन फ्रॅंक यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. मी त्या संधीचा फायदा घेतला आणि त्यांना सांगितलं की मी माझ्या चित्रपटातील मोठा भाग हा पुपुल जयकर यांच्या आत्मकथेतून घेतला आहे. ज्यांना तुमचे वडील राजीव गांधीजी यांनी लॉन्च केलं होतं. मी त्यांना चित्रपट पाहण्यास सांगितलं. त्या परत हसत म्हणाल्या, 'हम्म'. त्या त्यांच्या भावापेक्षा खूप वेगळ्या आहेत. जे फक्त हसले होते, त्यांच्यात शिष्टाचार नाही. तरी सुद्धा मी त्यांना चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रित केलं."
हेही वाचा : चहलकडून घटस्फोटावर शिक्कामोर्तब? घरच्यांचा उल्लेख करत केलेल्या पोस्टमधून 'तो' शब्द मुद्दाम वगळला?
पुढे कंगना रणौतनं राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीविषयी सांगितलं की "मी त्यांना म्हणाले की तुमची आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर असलेला हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहा. तुम्हाला आवडेल असं मला वाटतं. त्यावर राहुल यांनी माझ्याकडे पाहिलं आणि फक्त हसले. काहीच न बोलता ते तिथून निघून गेले. त्यांची ही वागणूनक मला आवडली नाही. त्यांच्यात थोडाही शिष्ठाचार नाही."