नॉन व्हेजमुळे झाला निलम कोठारीचा घटस्फोट? म्हणाली, 'मला परदेशात नेऊन...'

Neelam Kothari : नीलम कोठारीनं ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलीवुड वाइव्स’ या शोमध्ये या सगळ्या गोष्टीविषयी खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 20, 2024, 04:12 PM IST
नॉन व्हेजमुळे झाला निलम कोठारीचा घटस्फोट? म्हणाली, 'मला परदेशात नेऊन...' title=
(Photo Credit : Social Media)

Neelam Kothari : नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलीवुड वाइव्स’ हा शो सध्या सगळे पाहत आहेत. पहिले दोन सीजन हिट झाल्यानंतर निर्माते त्याचा तिसरा सीझन घेऊन आले आहेत. ज्यात बॉलिवूड कलाकारांच्या पत्नी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी सांगितलं. त्यात अभिनेत्री नीलम कोठारे देखील दिसते. निलमनं या शोमध्ये पहिल्यांदा तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीविषयी आणि त्यांच्या घटस्फोटाविषयी सांगितलं आहे. 

‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलीवुड वाइव्स’ च्या तिसऱ्या सीझनमध्ये महीप कपूर, सीमा सजदेह आणि भावना पांडेसोबत यावेळी शालिनी पासी, रिद्धिमा साहनी आणि कल्याणी साहा तावला देखील दिसले. शोच्या एका एपिसोडमध्ये नीलमनं दिग्दर्शिका आणि निर्माता एकता कपूरशी बोलताना सांगितलं की जेव्हा तिच्या मुलीला इंटरनेटच्या माध्यमातून पहिलं लग्न आणि घटस्फोटाविषयी कळलं तेव्हा तिची रिअॅक्शन कशी होती. त्यासोबत तिनं काय प्रश्न विचारला हे देखील सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

घटस्फोटाविषयी बोलताना नीलमनं सांगितलं की 'मी कामावरून घरी आले होते आणि अहाना तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत होती. साधारणपणे ते नेहमीच इथे-तिथे उडी मारत किंवा खेळताना दिसतात, ओरडतात-मज्जा करतात, पण यावेळी ते अगदी शांत होते. मग अहाना माझ्याकडे आली आणि म्हणाली, 'आई, तू मला कधीच सांगितलं नाही की तू घटस्फोटित आहेस.' हे ऐकल्यावर मी शांत झाले. माझ्याकडे काही शब्द नव्हते. मी अहानाला विचारलं की सगळ्यात आधी तुला याविषयी कसं कळलं. तिनं सांगितलं की तू एक सेलिब्रिटी आहेस, त्यामुळे मी आणि मेरे मित्र-मैत्रिणी तुझ्याविषयी गूगल करत होतो. सगळ्यात आधी तू घटस्फोटित आहेस हे समोर आलं. तुझं लग्न झालं होतं. तिच्या मुलीला तिच्या पहिल्या लग्नाविषयी अशा प्रकारे माहित व्हावं अशी तिची इच्छा नव्हती.' 

हेही वाचा : कियारा अडवाणीला नाही माहित दाक्षिणेतील राज्यांची नावं; 'त्या' व्हिडीओवरून झाली ट्रोल

त्यानंतर पुढे नीलमनं सांगितलं की 'तिला घटस्फोट घेण्यासाठी कोणत्या गोष्टीनं मजबूर केलं. नीलमनं शेअर केलं की ऋषी सेठियाशी लग्न केल्यानंतर ती परदेशात गेली होती. त्यांनी सांगितलं की मला भारतीय पोशाखात रहावं लागेल, नॉन व्हेज खाता येणार नाही आणि मद्यपान करता येणार नाही. इतकंच नाही तर मला माझं नाव बदलण्यास देखील सांगितलं होतं आणि मी ते देखील केलं. अनेक लोक असं करतात. खरंतर, आपली ओळख बदलनं? हे असं काही आहे की या गोष्टीला माझा पाठिंबा नाही. मी या पॉइंटला पोहोचले होते, जिथे मी स्वत: ला प्रश्न विचारला की मी हे कसं होऊ देते. अनेकदा असं झालं की जेव्हा मी सुपरमार्केटमध्ये असायचे किंवा जेवणासाठी बाहेर जायचे, तेव्हा कोणी माझ्या जवळ यायचं आणि विचारायचं, तुम्ही अभिनेत्री नीलम आहात आणि मी बोलायचे नाही, मी नीलम नाही.'