मुंबई : नेहा कक्कड आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाची चर्चा सगळीकडेच होत आहे. 14 फेब्रुवारीला हे दोघं जण लग्नबंधनात अडकणार आहेत. यांच्या कुटुंबियांनी देखील या लग्नाला मान्यता दिली आहे. असं असताना आता नेहाचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता हिमांश कोहलीची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हिमांशने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. याबरोबर हिमांश म्हणतो की,'आपल्या डोक्यात एखादी गोष्ट सुरू होते. आणि संपते देखील. पण काहीही झालं तरी आपण कायम आनंदी राहिलं पाहिजे.' हिमांशची ही पोस्ट नेहाच्या लग्नासोबत जोडली गेली आहे.
एकेकाळी हिमांश कोहली आणि नेहा कक्कड रिलेशनशिपमध्ये होते. दोघं सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करायचे. मात्र काहि काळाने या दोघांच ब्रेकअर झाल्याचं कळलं. यानंतर नेहा कक्कड एका शोमध्ये ब्रेकअपमुळे रडताना दिसली. यानंतर त्यांच ब्रेकअप अगदी जगजाहीर झालं.
आता नेहा आणि आदित्यच्या लग्नाची चर्चा आहे. याबाबत गायक उदित नारायण यांच्याकडून देखील अधिकृत माहिती देण्यात आली. आता सगळ्यांच्या नजरा या 14 तारखेला होणाऱ्या यांच्या लग्नाकडे आहेत.