मुंबई : 'झी मराठीवर वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. मुख्य म्हणजे लोपप्रिय मालिका 'अग्गबाई सूनबाई' या मालिकेत आता नवा ट्विस्ट येणार आहे. ही मालिका सुरू झाल्यापासून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील आसावरी, अभिजीत राजे, शुभ्रा, सोहम आणि आजोबा ही सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या घरातील एक झाली असून त्यांच्यावर सर्वजण भरभरून प्रेम करत आहेत. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे
शुभ्राची जागा बळकावण्यासाठी सुझॅन अनेक प्रयत्न करतेय. मात्र आता या मालिकेत नवं वळण आलं आहे. सोहम आणि सुझॅनचं नातं आता आसावरीच्या समोर येणार आहे. हा भाग आपल्याला वटपौर्णिमा विशेष भाग , २४ जून रात्री ८.३० वा. झी मराठीवर पाहता येणार आहे. यानंतर या मालिकेत आसावरी कोणत पाऊल उचलणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शुभ्रा सुझॅन आणि सोहमला कसं वठणीवर आणणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
दुसरीकडे 'पाहिले न मी तुला' मालिकेत मनुची ही पहिली वटपौर्णिमा असणार आहे. मानसीचं वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण होवू नये म्हणून समर, भोपेच्या मदतीने अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र या सगळ्या अडथळ्यांवर मात करत मानसी हे व्रत पूर्ण करते आणि समरचा डाव फसतो.
'माझा होशील ना' मालिकेमध्ये देखील सई आणि गुलप्रीत मामींची पहिली वटपौर्णिमा साजरी होणार आहे. त्यामुळे येत्या वटपौर्णिमेला झी मराठीवर मालिकेत नव नवे ट्विस्ट पाहता येणार आहेत