नेमकं काय चाललंय यांचं? राम गोपाल वर्मा, इनाया सुलतानाचा आणखी एक Video पाहून नेटकरी हैराण

आधीच्या व्हिडीओमध्ये राम गोपाल वर्मा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं म्हटलं जात होतं 

Updated: Aug 26, 2021, 06:05 PM IST
नेमकं काय चाललंय यांचं? राम गोपाल वर्मा, इनाया सुलतानाचा आणखी एक Video पाहून नेटकरी हैराण  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : काही दिवसांपूर्वीच चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (ram gopal verma ) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता. त्यामागोमागच आता आणखी एका व्हिडीओनं नेटकऱ्यांना हैराण केलं आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये RGV इनाया सुलताना (Inaya Sultana) हिच्यासोबत डान्स करताना दिसत आहेत. इनायानं स्वत: तिच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये या दोघांचाही डान्स पाहून हे नेमकं काय सुरु आहे, असाच प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

यापूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राम गोपाल वर्मा मद्यधुंद अवस्थेत इनायाहा हात पकडून तिला मिठी मारत डान्स करताना दिसले होते. आताही असाच काहीचा व्हिडीओ इनायानं शेअर केला आहे. ज्यानंतर त्यांची खिल्लीही उडवली जात आहे. 

हाय रामा ये क्या हुआ? अभिनेत्रीच्या बर्थडे पार्टीत मद्यधुंद अवस्थेत राम गोपाल वर्मांचा डान्स

 

पहिल्या व्हिडीओनंतर राम गोपाल वर्मा यांनी आपण या व्हिडीओमध्ये नाहीच आहोत, अशा आशयाचं ट्विट केलं होतं.  त्यांचं हे ट्विट, तिथं इनायानं शेअर केलेला फोटो हे सारं काही पाहून या मंडळींना नेमकं काय सांगायचंय हाच गोंधळवणारा प्रश्न नेटिझन्सना पडला.