ऑस्कर विजेत्या स्नेहा, सुमनचे भारतात जंगी स्वागत

दिल्लीतील हापुडमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचे जय्यत स्वागत करण्यात आले. 

Updated: Mar 5, 2019, 11:11 AM IST
ऑस्कर विजेत्या स्नेहा, सुमनचे भारतात जंगी स्वागत title=

मुंबई : ९१ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये मोठ्या उत्साहात पार पाडला. या ऑस्कर सोहळ्यातील भारतीय विजेत्या स्नेहा आणि सुमन  सोमवारी त्यांच्या मायदेशी परतल्या आहेत. दिल्लीतील हापुडमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचे जय्यत स्वागत करण्यात आले. भारताच्या ग्रामीण भागात मासिकपाळीच्या वेळी महिलांना होणारा त्रास त्याचप्रमाणे पॅडची अनुपलब्धता याविषयांवर आधारलेला 'पिरीयड एन्ड ऑफ सेंटेन्स' या लघु सिनेमाला 'डॉक्यूमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. 

 

सूत्रांनी सांगितल्यानूसार, हापुड क्षेत्रातील काठीखेडा गावात राहणाऱ्या स्नेहा आणि सुमनच्या स्वागत सोहळ्याची सुरूवात पिलखुवा पासून करण्यात आली पुढे श्याम प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत पालिकाध्यक्ष प्रफुल्ल सारस्वत यांच्या उपस्थतीत त्यांचे  मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर आमदार विजय पाल यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वागत केले. शेवटी त्यांच्या प्राथमिक विद्यालयात त्यांच्या स्वागत सोहळ्याची सांगता करण्यात आली. 

भारताच्या ऑस्कर विजेत्या स्नेहा आणि सुमन म्हणाल्या, 'आमच्या यशा मागे गावकऱ्यांचा पाठिंबा आणि आशिर्वाद असल्यामुळे हे शक्य झाले. आता यापुढेही हा उद्योग अशाचप्रकारे प्रगतीपथावर पोहोचवून गावातल्या महिलांना रोजगाराच्या संधी आणि योग्य सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न करू.' पूर्ण एक दशकानंतर भारताला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. २००९ साली एआर रेहमान आणि साउंड इंजीनियर रसूल पोकुट्टी ‘स्लमडॉग मिलेनियर’ सिनेमाला अकादमी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.