Oscars 2024 : ऑस्करआधी झाली धमाकेदार पार्टी; ओपनहाइमरला मिळाली सर्वाधिक नामांकने

ऑस्करच्या प्री पार्टीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोझ कनेक्शनने सोशल मीडिया अकाउंटवर पार्टीचा फोटो शेअर केला आहे. 

Updated: Mar 10, 2024, 07:25 PM IST
Oscars 2024 : ऑस्करआधी  झाली धमाकेदार पार्टी; ओपनहाइमरला मिळाली सर्वाधिक नामांकने   title=

Pre Oscar Awards 2024 party : काहीच वेळात ऑस्कर अवॉर्ड पार पडणार आहे. नेहमीच या सोहळ्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र या अवॉर्ड नाईटआधी एका पार्टी होस्ट करण्यात आली होती. या पार्टीत हॉलिवूडच्या अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ही पार्टी वेस्ट हॉलीवूडच्या सनसेट टॉवर हॉटेलमध्ये झाली. या पार्टीत कियियन मर्फी, रॉबर्ट डाउनी जूनियक, हॅली बीबर आणि ब्लॅकपिन रोज सारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. याचबरोबर  शेरोन स्टो, ओलिविया वाइल्ड, एंथली वेकारेलो, आणि एंजा रुबीकादेखील दिसले. 

ऑस्कर अवॉर्ड कधी आणि कुठे पाहू शकतो
आम्ही तुम्हाला सांगतो की, ऑस्कर अवॉर्ड कॅलिफॉर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. अमेरिकामध्ये रेड कार्पेट सेरेमनी आणि पुरस्कार सोहळा काहीच तासात सुरु होणार आहे. तर भारतात ऑस्करची लाईव्ह स्ट्रिमिंग सोमवारी11 मार्चला होणार आहे. हा इव्हेंट सोमवारी सकाळी ४ वाजता ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकतो. 

ऑस्करच्या प्री पार्टीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोझ कनेक्शनने सोशल मीडिया अकाउंटवर पार्टीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ब्लॅकपीन रोजसोबत हेली बीबर पोज देताना दिसत आहे. याचसोबत त्यांच्यासोबत रोन स्टो, ओलिविया वाइल्ड, एंथली वेकारेलो, आणि एंजा रुबीका दिसत आहे.
 
ओपनहायमरला मिळाले सगळ्यात जास्त नॉमिनेशन
सुपरहिट बायोपिक ओपनहाइमरला ऑस्करमध्ये सगळ्यात जास्त नॉमिनेशन मिळाले आहेत. या बायोपिकला बेस्ट पिक्चर आणि बेस्ट डायरेक्टरसोबत 13 नामांकने मिळाली आहेत. इतर नामांकित चित्रपटांमध्ये बार्बी, पुअर थिंग्ज आणि किलर्स ऑफ द फ्लॉवर मून यांचा समावेश आहे.

 भारतातून ही डॉक्यूमेंट्री फिल्म झालीये नॉमिनेट
ऑस्करमध्ये भारताची डॉक्यूमेंट्री फिल्म नॉमिनेट झाली आहे. झारखंडमधील एका छोट्या गावावर बनवलेल्या टू किल अ टायगर या डॉक्युमेंटरीलाही ऑस्कर २०२४ साठी नामांकन मिळालं आहे. या सिनेमाची कथा झारखंडमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेवर आणि त्यानंतरच्या न्यायासाठीच्या लढ्यावर आधारित आहे.