Oscars 2024 Winners List: ऑस्कर 2024 चा पुरस्कार सोहळा हा आज लॉस एन्जलिसमध्ये असलेल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. त्यावेळी नामांकन मिळालेल्या प्रत्येक व्यक्तीची नजर ही त्या ऑस्करच्या ट्रॉफीवर होती. खरंतर हा पुरस्कार 23 कॅटेगरी मध्ये देण्यात आला. ज्यात क्रिस्तोफर नोलनच्या 'ओपनहायमर' नं बाजी मारली आहे. या चित्रपटानं वेगवेगळ्या कॅटेरगीमध्ये जवळपास 7 पुरस्कार स्वत: च्या नावी केले आहेत. तर पुअर थिंग्सला 11 कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं. तर चित्रपटाला 4 कॅटेगरीमध्ये ऑस्कर पुरस्कार मिळवला. यंदाच्या ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतून फक्त एक डॉक्युमेंट्री फीचर फिल्म नॉमिनेट झाली आणि त्यांना देखील यावेळी पुरस्कार मिळाला नाही. त्या डॉक्युमेंट्रीचे नाव 'टू किल ए टाइगर' असे होते.
ऑस्कर पुरस्कार हा जगातील सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. ज्याचं स्वप्न प्रत्येक कलाकार पाहत असतो. प्रत्येकाला आशा असते की आपल्याला हा पुरस्कार मिळेल. यावेळी पहिल्यांदा रॉबर्ट डाउनी ज्यूनियरला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. रॉबर्ड डाउनी ज्युनियरला या आधी तीन वेळा नामांकन मिळालं होतं. मात्र, पहिल्यांदाच असा पुरस्कार मिळाला आहे. तर बिली इलिशनं 87 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे. कमी वयात दोन पुरस्कार मिळवणाऱ्याचा रेकॉर्ड तिनं मोडला आहे.
ऑस्कर 2024 विजेत्यांची कॅटेगरी | ऑस्कर विजेत्यांनी नावं |
सर्वोत्कृष्ट चित्रपट | ओपनहायमर |
सर्वोत्कृष्ट अभिनेता | किलियन मर्फी (ओपनहायमर) |
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री | एम्मा स्टोन (पुअर थिंग्स) |
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक | क्रिस्टोफर नोलन (ओपनहायमर) |
सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉन्ग | व्हाट वॉज आई मेड फॉर (बार्बी) |
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता | रॉबर्ड डाउनी ज्युनियर (ओपनहायमर) |
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री | दा'वाइन जॉय रैंडोल्फ (द होल्ड ओव्हर्स) |
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर | लुडविग गोरानसन (ओपनहायमर) |
सर्वोत्कृष्ट साउंड | द झोन ऑफ इंटरेस्ट |
सर्वोत्कृष्ट लाइव अॅक्शन शॉर्ट फिल्म | द वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर |
सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी | ओपनहायमर |
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्म | 20 डेज इन मारियुपोल |
सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेन्ट्री शॉर्ट फिल्म | द लास्ट रिपेयर शॉप |
सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग | ओपनहायमर |
सर्वोत्कृष्ट व्हिजुअल इफेक्ट | गॉडजिला माइनस वन |
सर्वोत्कृष्ट इंटरनेशनल फीचर फिल्म | द झोन ऑफ इंटरेस्ट |
सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिजाइन | पुअर थिंग्स |
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन | पुअर थिंग्स |
सर्वोत्कृष्ट हेअर आणि मेकअप | पुअर थिंग्स |
सर्वोत्कृष्ट एडेप्टेड स्क्रीनप्ले | अमेरिकन फिक्शन |
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले | एनाटॉमी ऑफ ए फॉल |
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म | द बॉय अॅन्ड द हेरॉन |
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म | वॉर इस ओवर! इंस्पायर्ड बाय द म्यूजिक ऑफ जॉय अॅन्ड योको |