Ameen Sayani Passes Away : पुन्हा एकदा कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे. रेडियोच्या जगातील एक आवाज आता आपल्यात नाही. ‘रेडियो किंग’ अशी ओळख असणारे दिग्गज रेडिओ प्रेझेंटर अमीन सयानी यांचे निधन झाले आहे. 91 व्या वर्षी अमीन सयानी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाची बातमी त्यांचा मुलगा रजिल सयानी यांनी कंफर्म केली आहे.
अमीन सयानी यांना आजही लोक विसरलेले नाही. रेडियोवर जे लोक ‘बिनाका गीतमाला’ ऐकायचे त्यात असलेली अमीन सयानी यांची एनर्जी आणि त्यांचा मेलोडियस अंदाज आजही सगळ्यांच्या लक्षात असेल. तर त्यांच्या निधनानं कला क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. India Today ला दिलेल्या मुलाखतीत अमीन सयानी यांचा मुलगा रजिल सयानीनं त्यांच्या निधनाच्या बातमीला कंफर्म केलं. त्यांनी सांगितलं की अमीन सयानी यांना काल हार्ट अटॅक आला. ज्यानंतर लगेच त्यांना एचएन रिलायंस हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्यांनी प्राण सोडले. अमीन सयानी यांच्या पार्थीवावर उद्या म्हणजेच 22 फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार होणार आहे. त्यासाठी कुटुंबातील काहीच लोक उपस्थित राहतील. दरम्यान, त्यांच्या अखेरच्या दर्शनाविषयी ऑफिशियल स्टेटमेंट लवकरच जारी करण्यात येईल.
अमीन सयानी हे गेल्या बऱ्याच काळापासून आरोग्या संबंधीत अनेक समस्यांचा सामना करत होते. गेल्या 12 वर्षांपासून त्यांना पाठ दूखीची समस्या सुरु होती आणि हेच कारण होतं की त्यांनी चालण्यासाठी सतत वॉकरची गरज भासायची.
अमीन सयानी यांचा जन्म 21 डिसेंबर 1932 मध्ये मुंबईत होणार आहे. अमीन सयानी यांनी रेडिओच्या जगात खूप मोठ नाव कमावलं आहे. त्यांच्या आवाजानं सगळ्यांची मने जिंकली होती. प्रत्येक घरा-घरात रेडिओ म्हटल्यावर फक्त अमीन सयानी यांचं नाव तोंडात यायचं. अमीन सयानी यांनी एक रेडिओ प्रेझेंटर म्हणून करिअरची सुरुवात केली आहे. हे ऑल इंडिया रेडिओ मुंबईमध्ये कामाला होते. त्यांचे भाऊ हामिद सयानी यांनी त्यांना या क्षेत्राविषयी माहिती दिली होती. त्यांनी इथं 10 वर्ष इंग्लिश प्रोग्राम्समध्ये पॉर्टिसिपेट केलं. त्यानंतर त्यांनी भारतात ऑल इंडिया रेडियोला लोकप्रियता मिळवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.