इन्स्टाग्रामवर तलाक देणारी मुस्लिम राजकुमारी कोण?

दुबईची राजकुमारी शेख महारा बिंत मोहम्मद बिन राशिद अल मकतूम सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत राजकुमारीने नवऱ्याला घटस्फोट दिला आहे. 

Updated: Jul 18, 2024, 01:02 PM IST
इन्स्टाग्रामवर तलाक देणारी मुस्लिम राजकुमारी कोण?  title=

Sheikha Mahra Divorce News: दुबईची राजकुमारी शेख महारा सध्या खूपच चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने तलाक..तलाक..तलाक..तुमची माजी पत्नी, काळजी घ्या असं म्हटलं आहे. सध्या तिच्या इन्स्टा तलाकची तुफान चर्चा होत आहे. शेख महाराने मुलाच्या जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यांनी नवऱ्याला तलाक दिला आहे. शेख माहराच्या पतीचे नाव शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन मना अल मकतूम आहे. 

दुबईचे शासक मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची मुलगी शेखा हिने तिच्या नवऱ्यावर दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप करत घटस्फोट  घेतल्याची जाहीर घोषणा केली आहे. घटस्फोटाची चर्चा सुरु असतानाच तिच्या सौंदर्याने देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

2 महिन्यांपूर्वी मुलीला जन्म

शेखाने दोन महिन्यांपूर्वीच आपल्या मुलीला जन्म दिला. आता तिने नवऱ्यापासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे. सर्वत्र शेखाच्या इन्स्टा तलाकची चर्चा होत आहे. तर कुणी तिच्या सौंदर्याचं कौतुक देखील करत आहे. मात्र, इन्स्टाग्रामवर तलाक दिल्यामुळे शेखाची हा स्टाईल चाहत्यांना आवडली आहे. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

राजकुमारीची इन्स्टा पोस्ट 

राजकुमारीच्या या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.  तलाकनंतर दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.  एकमेकांचे सर्व फोटो त्यांच्या प्रोफाइलमधून काढून टाकले आहेत. मात्र, काही लोकांनी एकमेकांना ब्लॉक केल्याचा अंदाज लावला, तर काहींनी शेखा मेहराचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

चाहत्यांच्या प्रतिक्रिया 

दुबईच्या राजकुमारीच्या तलाकच्या बातमीनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. एका यूजरने लिहिले की, वाईट बातमी. देव तुम्हाला आशीर्वाद देईल, तर दुसऱ्या यूजरने लिहिले, मला अभिमान आहे. तुझ्या निर्णयावर.