व्हिडिओ : एअरपोर्टवर पोहचताच प्रियंकाने लपवली एन्गेजमेंट रिंग

सध्या कायम चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोप्रा. 

Updated: Aug 7, 2018, 02:20 PM IST
व्हिडिओ : एअरपोर्टवर पोहचताच प्रियंकाने लपवली एन्गेजमेंट रिंग title=

मुंबई : सध्या कायम चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोप्रा. अगदी दररोज मीडियात तिचा बोलबाल असतो, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण गेल्या काही दिवसांपासून प्रियंका तिच्या निकसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे. अलिकडेच तिने सलमान खानचा भारत सिनेमा सोडल्याने चर्चेत होती. त्यानंतर प्रियंका-निकच्या साखरपुड्याची खबर जोर धरु लागली. इतकंच नाहीतर ही जोडी  याचवर्षी ऑक्टोबरमध्ये विवाहबद्ध होईल, अशा चर्चांना उधाण आले.

आता प्रियंकाचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात प्रियंका तिची एन्गेजमेंट रिंग लपवताना दिसत आहे. प्रियंका एअरपोर्टवर पोहचताच तिने रिंग काढून पॅंटच्या खिशात लपवली, हे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर फॅनला ऑटोग्राफ देत ती निघून जाते.

तुम्हीच पाहा हा व्हिडिओ...

 

गेल्या काही दिवसांपासून प्रियंका तिच्या एन्गेजमेंट रिंगमुळे चांगलीच चर्चेत होती. रिंगसहीत तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात तिने तिच्या डाव्या हातात रिंग घातली होती आणि तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.