मुंबई : 'नॅशनल क्रश' अशी ओळख असणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिला आता कोणत्याही परिचयाची गरज नाही. दाक्षिणात्य कला जगतापुरताच मर्यादित असणारी हीच रश्मिका आता बॉलिवूडमध्येही पदार्पण करण्याच्या तयारीत दिसत आहे.
'पुष्पा' या चित्रपटामध्ये तिनं साकारलेल्या श्रीवल्लीवरून कोणाची नजर हटत नाही, तोच आता रश्मिकानं पुन्हा एकदा तिच्या अदांनी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.
जिची एक झलक पाहण्यासाठी चाहते सध्या बेभान असतात त्याच रश्मिकानं सोशल मीडियावर तिचा नवा फोटो पोस्ट करत नजरा वळवल्या आहेत.
एकिकडे अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबतचं तिचं नातं, त्यातच रंगणाऱ्या लग्नाच्या चर्चा आणि त्यातच रश्मिकाचा हा मादक अंदाज बऱ्याच चर्चांना वाव दिला आहे.
Lights, Camera & Action असं कॅप्शन लिहित तिनं हा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये ती काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. स्ट्रॅपलेस अशा या तिच्या गाऊनला असणारा लाँग स्लिट ड्रेसमधील विशेष लक्षवेधी गोष्ट ठरत आहे.
मिनिमल ज्वेलरी लूक रश्मिकानं आता नेमका कोणासाठी केला आहे, हे मात्र कळलेलं नाही. पण, काही असेना तिला पाहून भल्याभल्यांचा खेळ खल्लास झाला असणार असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.
खरंच लग्न करणार रश्मिका?
काही दिवसांपूर्वीच रश्मिकानं लग्नाच्या मुद्द्यावर एका प्रश्चाचं उत्तर दिलं. यामध्ये ती आपण फारच लहान असल्याचं बोलून गेली. अद्यापही लग्नाचा विचार डोक्यात नसल्याचंही तिनं स्पष्ट केलं. (rashmika mandanna)
पण, दुसरीकडे मात्र अभिनेता विजय देवरकोंडा याच्याशी असणारी तिची मैत्री किंवा त्याहूनही खास नातं मात्र कोणाच्याही नजरेआड राहिलेलं नाही. तेव्हा आता ही जोडी खरंच रिलेशनशिपमध्ये आहे का आणि खरचं लग्न करणार का, असेच प्रश्न चाहते विचारत आहेत.