मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोनाचं सावट आहे. कोविड-१९ च्या महामारीत सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कोरोना रूग्ण आपल्याच माणसांपासून काही दिवस लांब असतो. कोरोनावर उपचार सुरू असताना आपल्या माणसाशी भेट होत नाही. यामुळे कोरोना रूग्ण मानसिक दृष्ट्या खचतो. अशावेळी आपल्या माणसाचे शब्द देखील पुरेसे असतात. याच आशयाची एक शॉर्ट फिल्म नीना कुलकर्णी यांनी सादर केली आहे.
या शॉर्ट फिल्मची सध्या जोरदार चर्चा होत आहे. गौतम वझे दिग्दर्शित 'राबता' या शॉर्टफिल्ममधून खूप सुंदर संदेश दिला आहे. नीना कुलकर्णी यांनी या शॉर्ट फिल्मच पोस्टर इंस्टाग्रामर शेअर केली आहे. यामध्ये नीना कुलकर्णी, अरूंधती नाग आणि आयुषी लहिरी हे तीनच पात्र आहेत.
या महामारीच्या काळात सगळेजण घरातच आहेत. घरात राहण्याचा प्रत्येकाला त्रास होत आहे. घरात राहिल्यामुळे आता नैराश्य येत आहे. आपुलकीच्या माणसांचा प्रेमाचा शब्द नाही का स्पर्श नाही. अशाच आशयावर आधारित ही ३ मिनिटांची शॉर्ट फिल्म आहे.