मुंबई : अभिनेता सलमान खानच्या रेस 3 वर समीक्षकांनी टीका केली असली तरीही या चित्रपटाला चाहत्यांकडून वाहवा मिळत आहे. अवघ्या तीन दिवसामध्ये रेस 3ने 100 कोटी क्लबमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. मात्र सोबतच एक खास विक्रमही रचला आहे.
रेस 3 चं विकेंडमधील बॉक्सऑफिस कलेक्शन 100 कोटींच्या पार गेलं आहे.त्यामुळे पहिल्या विकेंडला सर्वधिक कमाई करण्याच्य यादीत रेस 3 हा सिनेमा दुसर्या क्रमांकावर आहे. पद्मावत पाठोपाठ यंदा 'रेस 3'ला उत्तम ओपनिंग मिळालं आहे. यंदाच्या टॉप 5 विकेंड ओपनर्सच्या यादीमध्ये अव्वलस्थानी 'पद्मावत' त्यानंतर 'रेस 3', त्यापाठोपाठ टायगर श्रॉफचा बागी 2, अजय देवगणचा 'रेड', अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' हा सिनेमा आहे.
TOP 5 - 2018
Opening Weekend biz...
1. #Padmavaat 114 cr [5-day *extended* weekend; select previews on Wed, released on Thu]... Hindi + Tamil + Telugu.
2. #Race3 106.47 cr
3. #Baaghi2 73.10 cr
4. #Raid 41.01 cr
5. #PadMan 40.05 cr
India biz.— taran adarsh (@taran_adarsh) June 18, 2018
'रेस 3' सिनेमामध्ये सलमान खान सोबत जॅकलीन फर्नांडिस, डेजी शहा, बॉबी देओल, अनिल कपूर, साकिब सलीम अशी तगडी स्टारकास्ट आहे. मात्र समीक्षकांच्या मते, चित्रपटाची कहाणी किंवा तगडी स्टारकास्ट फारशी कमाल दाखवू शकलेली नाही.
रेस 3 प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाचे सॅटॅलाईट राईट्स विकले गेले आहेत. रेस 3 ची रीलिजपूर्वीच 'दंगल'वर मात, बॉलिवूडचा 'असा' पहिलाच सिनेमा