AR Rahman नं कोणावर ठोकला 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा? वाचा सविस्तर प्रकरण

AR Rahman : ए आर रहमाननं कोणावर आणि का ठोकला 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा? 

दिक्षा पाटील | Updated: Oct 5, 2023, 12:00 PM IST
AR Rahman नं कोणावर ठोकला 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा? वाचा सविस्तर प्रकरण title=
(Photo Credit : Social Media)

AR Rahman : बॉलिवूडचे लोकप्रिय आणि दिग्गज म्यूजिक दिग्दर्शक ए आर रहमान सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते चेन्नईत झालेल्या त्यांच्या एका कार्यक्रमामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. हे प्रकरण थांबलंच नाही आणि त्यांचं नाव त्या प्रकरणाशी जोडण्यात आलं. खरंतर, एसोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियानं ए आर रहमान विरोधात तक्रार दाखल करत त्याच्यावर पैशे उकरण्याचा आरोप केला होता. आता त्याला उत्तर देत सर्जन एसोसिएशनविरोधात मानहानिचा दावा केला असून त्यासोबत माफी मागण्यास सांगितले आहे. इतकंच नाही तर त्यानं 10 कोटी नुकसान भरपाई मागणी केली आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घया. 

ए आर रहमानविरोधात तक्रार दाखल

गेल्या आठवड्यात सर्जन एसोसिएशननं ए आर रहमानविरोधात एक तक्रार देखील केली होती. या तक्रारित आरोप करण्यात आला होता की 2018 मध्ये असोसिएशनच्या 78 व्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यासाठी ए आर रहमाननं त्यांच्याकडून 29 लाख रुपये घेतल्याचा आरोप करत सर्जन असोसिएशनने संगीतकाराच्या विरोधात एक आठवड्यापूर्वी तक्रार दाखल केली होती. त्यावेळी त्यांनी म्हटलं की पैसे घेऊनही ए.आर.रहमान या कार्यक्रमात पोहोचू शकला नाही. त्यानंतर या संघानं ए. आर रहमानवर कार्यक्रमाला न जाता पैसे घेतल्याचा आरोप केला. मात्र, ए. आर रहमानच्या वकिलानं आपल्या 4 पानी उत्तरात हे आरोप फेटाळून लावले आहेत. ए आर रहमान यांनी संघाकडून एकही पैसा घेतला नाही, त्यांच्यावर खोटे आरोप करून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे न्यायालयात सादर केलेल्या उत्तरात म्हटले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : VIDEO : 'कपडे काढण्याचं काम माझं नव्हतंच', कॉमेडीच्या नादात हे काय बोलला राज कुंद्रा...

ए आर रहमाननं संघाला बजावली नोटिस 

ए आर रहमाननं ही नोटिस पाठवत सर्जन संघाला त्याची माफी मागण्यास सांगितले आहे आणि तीन दिवसांच्या आत तक्रार मागे घेण्यास देखील सांगितले. त्याशिवाय 15 दिवसांच्या आत नुकसान भरपाई म्हणून 10 कोटी रुपये देण्याची देखील मागणी केली आहे. जर या संघानं ए आर रहमानच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर तो त्यांच्या विरोधात कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले जाते.