मुंबई : कोरोना व्हायरस आता हाता बाहेर जात आहे. बेड्स, ऑक्सिजन, औषधं यांच्या आभावामुळे रोज कित्येकांना या लढाईत आपल्या प्रणाची आहुती द्यावी लागत आहे. फक्त सर्वसामान्यांनांचं नाही तर अनेक सेलिब्रिटींना देखील या संकटांचा सामना करावा लागत आहे. अभिनेता राहुल वोहरा (Rahul Vohra)चा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रूग्णालयात उपचार हवे तसे न झाल्यामुळे माझ्या पतीचं निधन झालं असल्याचं वक्तव्य राहुलच्या पत्नीने केलं आहे.
राहुलच्या पत्नीचं नाव ज्योती तिवारी असं आहे. ज्योती तिच्या पतीचा एक शेवटचा व्हीडिओ पोस्ट केला आहे. व्हीडिओमध्ये राहुलने ऑक्सिजन मास्क काढत उपचारा दरम्यान आलेल्या अडचणींचा खुलासा केला आहे. 'आज ऑक्सिजनची गरज फार मोठी आहे. ' नर्सला सांगितल्यानंतर देखील कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याचं देखील राहुलने व्हीडिओमध्ये सांगितलं आहे.
व्हीडिओ पोस्ट करत ज्योतीने तिच्या पतीसाठी न्याय मागितला आहे. 'प्रत्येक राहुलसाठी न्याय. माझा राहुल गेला. पण तो कसा गेला ते कोणाला माहिती नाही. राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ताहिरपूर दिल्ली. अशी वागणूक दिली जाते...' असं ज्योतीने पोस्ट म्हटलं आहे. शिवाय राहुलला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी देखील केली आहे.