Raj Kundra Pornography Case: अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिला आता मुंबई पोलिसांनी बजावले समन्स

Porn Film case : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती  उद्योगपती राज कुंद्रा याच्या अश्लील प्रकरणात मुंबई पोलिसांनी आता आणखी एक अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिला समन्स बजावले आहेत. 

Updated: Jul 27, 2021, 10:50 AM IST
Raj Kundra Pornography Case: अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिला आता मुंबई पोलिसांनी बजावले समन्स title=

मुंबई : Sherlyn Chopra, pornography case, Raj Kundra, Bollywood, Mumbai, Porn Film case , News: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती  उद्योगपती राज कुंद्रा याच्या अश्लील प्रकरणात मुंबई पोलिसांनी आता आणखी एक अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिला समन्स बजावले आहेत. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री गहाना वशिष्ठ हिला समन्स बजावले होते. मात्र, आपण बाहेर असल्याने उपस्थित राहू शकत नाही, असे तिने स्पष्ट केले.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिला बोलावून अश्लील प्रकरणात आपला जबात नोंदवण्यासाठी आज मंगळवार सकाळी 11 वाजता हजर होण्यास सांगितले आहे. मुंबई पोलिसांनी काल सोमवारी शर्लिन हिला समन्स बजावले होते.

पॉर्न फिल्म प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेत्री गहाना वशिष्ठ आणि अन्य दोघांनाही समन्स पाठवून जबाब देण्यासाठी बोलावले होते पण रविवारी ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. दरम्यान, पॉर्न फिल्मच्या निर्मितीप्रकरणी आणि काही अॅप्सद्वारे उघडकीस आणल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याला अटक केली. राज कुंद्रा याच्या अटकेनंतर वशिष्ठ हिने व्हिडिओमध्ये म्हटले होते की, 'उत्तेजक सामग्री' आणि अश्लीलता यात फरक आहे. वशिष्ठ हिने कुंद्रा याच्या अ‍ॅपसाठी बनवलेल्या तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने गेहाना वशिष्ठ आणि अन्य दोघांना अलीकडेच समन्स बजावले होते, परंतु रविवारी ते येथील पोलीस कार्यालयात उपस्थित राहीले नाहीत.

यापूर्वी मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास घेण्यापूर्वी महाराष्ट्रातील सायबर विभागाकडे पॉर्न फिल्म टोळीबद्दल तक्रार दाखल केली होती. ते म्हणाले की, मालवणी पोलिसांनी दोन महिलांच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदविला होता. या व्यतिरिक्त आणखी एका महिलेने मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावर लोणावळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. फेब्रुवारी 2021 मध्ये मालवणी पोलिस ठाण्यात पीडित काहींनी तक्रार दिल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तपासादरम्यान असे लक्षात आले की सायबर जगात अशी अनेक अॅप्स आहेत, ज्यावर अश्लील साहित्य दिले जाते. यानंतर पोलिसांनी निर्माता रोमा खान, तिचा नवरा, अभिनेत्री गहना वशिष्ठ, दिग्दर्शक तन्वीर हाश्मी आणि उमेश कामत यांना अटक केली, असे ते म्हणाले. नंतर वशिष्ठला जामीन मिळाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे.