मुंबई : चित्रपटसृष्टीत राजेश खन्ना यांना प्रेमाने काका म्हटलं जायचं. जेव्हा ते सुपरस्टार होते, तेव्हा एक प्रसिद्ध म्हण होती - ऊपर आका और नीचे काका. राजेश खन्ना मुलींमध्ये खूप लोकप्रिय होते. मुलींनी त्यांना रक्ताने देखील पत्र लिहिली आहेत.. तर काहींनी त्यांच्या फोटोशीच लग्नही केलं. तर काहींनी त्यांच्या हातावर आणि पायावर त्यांच्या नावाचे टॅटू काढले. राजेश खन्ना यांचं नाव बऱ्याच अभिनेत्रींसोबतही जोडलं गेलं होतं. पण असं म्हटलं जातं की, डिम्पल कपाडियासोबत लग्न केल्यानंतर राजेश खन्ना टीना मुनिमबरोबर रिलेशनशिपमध्ये आले
निरागस टीनावर राजेश मनापासून प्रेम करायचे. ते एकत्र राहू लागले. राजेश खन्ना यांनीदेखील हे नातं लपवलं नाही. वृत्तानुसार, एका मुलाखतीत राजेश खन्ना म्हणाले की, मी टीनावर एवढं प्रेम करतो की मी तिचा दात घासण्यासाठी टुथब्रश पण वापरतो. यानंतर त्यांच्या या मुलाखतीची खूप चर्चा देखील झाली
टिनाची इच्छा होती की डिम्पलला घटस्फोट देऊन त्यांनी तिच्याशी लग्न करावे. पण इच्छा असुनही राजेश हे करू शकले नाही. ते एका प्रकारे डिम्पलशीही जोडले गेले होते राजेश जेवढं प्रेम टिनावर करायचे त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम ते डिंपलवर करायचे. टीनाला वाटलं की राजेश तिला फक्त फसवत आहेत. बरीच वाट पाहिल्यानंतर टीनाने त्यांच्याबरोबर ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.
टीनाच्या निर्णयाने राजेश खन्ना पूर्णपणे तुटले होते. त्यांनी तिने सोडून जाऊ नये म्हणून अनेकवेळा टीनासमोर भीक मागितली. पण टीनाने निर्णय घेतला होता. जाताना टीनाने राजेश यांना गिफ्टही दिलं. तिने त्यांच्या 20 चित्रपटांची कॉपि बनवून त्यांना गिफ्ट दिलं.
नंतर संजय दत्त टीनाच्या आयुष्यात आला. पण टीनाने त्याला त्याच्या ड्रग्स अॅडिक्शनमुळे त्याला सोडून दिलं. आणि नंतर बिझनेसमन अनिल अंबानीशी लग्न केलं.