मुंबई : 2023 हे वर्ष रश्मिका मंदान्नासाठी खूप जबरदस्त असणार आहे. नॅशनल क्रश बनलेल्या या अभिनेत्रीचे या वर्षी चार चित्रपट तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीजसाठी सज्ज आहेत. यावर्षी तिचा सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा मिशन मजनू हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, रश्मिका या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रश्मिकाने अलीकडेच एका मुलाखतीत या चित्रपटादरम्यान तिला कोणत्या वेदना सहन कराव्या लागल्या याबद्दल सांगितलं आहे.
मिशन मजनू 20 जानेवारी 2023 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. रश्मिकाचा हा पहिला OTTरिलीज झालेला सिनेमा आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या या चित्रपटात रश्मिका तिच्या चित्रपट आयुष्यात पहिल्यांदाच एका अंध मुलीची भूमिका साकारत आहे.
मिशन मजनू हा शंतनू बागची दिग्दर्शित स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये परमीत सेठी, कुमुद मिश्रा, रजित कपूर, अर्जन बाजवा आणि शरीब हाश्मी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर 20 जानेवारी 2023 रोजी रिलीज होईल. याशिवाय रश्मिकाकडे एनिमल, वारीसु आणि पुष्पा: द राइज हे सगळे सिनेमा 2023 मध्ये रिलीज होणार आहेत.
एका मुलाखतीत, अभिनेत्रीने त्या व्यक्तिरेखेसाठी कशी तयारी केली, तिच्यासाठी हे आव्हान काय होतं याबद्दल खुलासा केला. रश्मिकाने याबद्दल सांगितलं की, ''एक अभिनेत्री म्हणून मी हे कधीच केलं नाही, खरं तर हा एक रेट्रो चित्रपट आहे त्यामुळे मला खूप वेगळे कपडे घालावे लागले आणि सीन चित्रित करण्यापूर्वी मला प्रशिक्षणही घ्यावं लागलं. रश्मिका मंदान्ना चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विचार करत होती की ती हे शूट कसं पूर्ण करेल. हे सर्व तिच्यासाठी पूर्णपणे नवीन होतं.
रश्मिकाने सांगितलं की, डोळ्यांचा वापर न करता अभिनय करणं खूप अवघड होतं. र "मी अशी व्यक्ती आहे जिला समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून बोलावं लागतं. संभाषणादरम्यान मी इकडे तिकडे पाहू शकत नाही.
मी या संपूर्ण चित्रपटात तारिककडे पाहू शकले नाही. हे करणं खूप कठीण होतं. मी हे क्षण जगले आहेत. हे आव्हान पेलायचं होतं. कॅमेरासमोर येण्याआधी रश्मिकाला अंध व्यक्तींची देहबोली समजून घेण्यासाठी कठोर प्रशिक्षण घ्यावं लागलं. रश्मिका म्हणाली, मी काही आठवड्यांपासून टॅक्सिंग वर्कशॉप घेत होते.
यानंतर मला प्रचंड डोकेदुखी व्हायची. खरं तर या प्रशिक्षणादरम्यान ते तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधतील आणि टेनिस बॉल तुमच्यावर फेकतील जेणेकरून तुम्हाला कळेल की ते कुठून येत आहेत. खरंतर ते अत्यंत भीषण होतं.