Salman khan : बॉलिवूड कलाकारांना आपण ज्या लूकमध्ये चित्रपटांमध्ये पाहतो ते खऱ्या आयुष्यातही तसेच आहेत असं अनेकांना वाटतं. अनेकदा तर असं होतं की तो कलाकार त्याच भूमिकेत अनेक दिवस राहतो, ते पाहता अनेकदा असं होतं की त्यांचे चाहते त्यांना फॉलो करण्यास सुरु करतात. असंच काहीसं बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत झालं. त्यानं देखील एक असाच चित्रपट केला होता. ज्या चित्रपटाचा प्रभाव त्याच्यावर काही दिवस होता. हा चित्रपट फक्त 10 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता आणि त्यानं 25 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सेमी हिट ठरला. पण चित्रपटातील गाणी प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली. या चित्रपटाविषयी सलमाननं नुकतंच केलेलं वक्तव्य पाहून तुम्हालाही आश्चर्य होईल.
सलमान खानसाठी 2002 हे वर्ष खूप कठीम होतं. ऐश्वर्या रायसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तो चुपचाप राहू लागला होता. त्याच्या या ब्रेकअपनंतर त्याला प्रेमात वेडा असलेल्या ‘राधे मोहन’ नावाची भूमिका ऑफर झाली. ‘राधे मोहन’ ही भूमिका ‘तेरे नाम’ या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटातील आहे. त्याच्या या भूमिकेविषयी बोलताना सलमान म्हणाला, जर तू खऱ्या आयुष्यात केलं तर तुला चप्पल मारतील, पण नेमकं असं काय झालं की सलमाननं त्याच्या या चित्रपटाचा उल्लेख केला असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. त्याचं कारण बिग बॉस हा रिअॅलिटी शो ठरला आहे. नुकताच 'बिग बॉस 17' विकेंड का वार स्पेशल एपिसोड झाला. त्यात सलमाननं स्पर्धक अभिषेक कुमारला खूप सुनावलं. यावेळी सलमान अभिषेकला त्याच्या एकतर्फी प्रेमावरून ओरडताना दिसला. यावेळी सलमान म्हणाला की "तो संपूर्ण शो पाहिल्यानंतर आला आहे. गौतम गुलाटी, करण कुंद्रा, असीम यांना पाहून तू आलास. तू या सगळ्यांची कॉपी करत आहेस."
सलमान पुढे म्हणाला की, "तू माझा फॅन आहे, पण माझ्यासारखी वागणूक तर तुझ्याकडे नाही. तर मग तुझं हे वागणं तेरे नाम पाहून आहे का, तू या घरात तेरे नाम पाहून आला आहेस? चित्रपटाच्या शेवटी पाहिलं ना तेरे नाम सारख्या व्यक्तीची शेवटी कशी परिस्थिती होते. तो चित्रपट आहे, खरं आयुष्य नाही, खऱ्या आयुष्यात चप्पल मारतील. तू स्वत: ला त्रास देऊन काय होणार आहे."
हेही वाचा : 20 वर्षांनी समोरासमोर येताच, रेखा पडल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या पाया; पाहा नक्की काय घडलं
दरम्यान, ही पहिली वेळ नाही जेव्हा सलमान खाननं असं काही केलं आहे. या आधी देखील सलमाननं त्याची ही भूमिका फॉलो करू नका म्हणजेच खऱ्या आयुष्यात राधे मोहनसारखे वागू नका असा सल्ला चाहत्यांना दिला होता.