फोटोग्राफर्स ओरडत होते भाई-भाई, कतरिनाला पाहून सगळचं विसरला सलमान

अभिनेता सलमान खान हा मनमौजी स्वभावाचा माणूस आहे. कोणतीही प्रेस कॉन्फरन्स असो वा सिनेमाचे शूटिंग सलमानच्या स्वभावात काही बदल होत नाही. 

Updated: May 9, 2018, 12:44 PM IST
फोटोग्राफर्स ओरडत होते भाई-भाई, कतरिनाला पाहून सगळचं विसरला सलमान title=

मुंबई : अभिनेता सलमान खान हा मनमौजी स्वभावाचा माणूस आहे. कोणतीही प्रेस कॉन्फरन्स असो वा सिनेमाचे शूटिंग सलमानच्या स्वभावात काही बदल होत नाही. नुकतीच सलमानने सोनमच्या रिसेप्‍शनमध्ये हजेरी लावली होती. जॅकलीन फर्नांडिजसोबत एंट्री घेणाऱ्या सलमानची नजर कतरिना कैफवर पडली आणि सलमान सगळचं विसरुन तिची भेट घेण्यासाठी गेला. मात्र जेव्हा त्याच्या भाई भाई असा आवाज तेव्हा त्याने मीडियाच्या दिशेने अभिवादन केले. सोनम कपूरचे रिसेप्शन द लीला हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. या रिसेप्शनला अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यामुळे मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात तेथे होते. रिसेप्शनमध्ये एंट्री घेणारे सर्वच कलाकार पहिल्यांदा मीडियासाठी पोज देत होते त्यानंतर आत जात होते. मात्र सलमान तर सलमान आहे. त्याच्याआधी बोनी कपूरच्या मुली जान्हवी कपूर, खुशी कपूर आणि अंशुला कपूर फोटोग्राफर्ससाठी पोज देत होत्या. त्यावेळी सलमान खान मागून आला आणि त्यांच्यात दाखल झाला.

सलमान खानसोबत त्याची रेस ३ ची हिरोईन जॅकलीन फर्नांडिजही होती. मात्र तेव्हा सलमानने गेटवर आपल्या बहिणीसोबत कतरिनाला पाहिले. सलमानला पाहताच सर्व फोटोग्राफर्स भाई भाई असे ओरडायला लागले. मात्र सलमानने तेथे दुर्लक्ष केले आणि कतरिनाला भेटण्यासाठी तो गेला.