मुंबई : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर 'इंशाअल्लाह' चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या मानात असलेली उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रूपेरी पडद्यावर सलमान-आलियाला एकत्र बघण्यासाठी भाईजानचे सर्वच चाहते उत्सुक आहेत. त्याचप्रमाणे 'इंशाअल्लाह' चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल २० वर्षांनंतर सलमान आणि संजय लिला भंसाळी एकत्र येणार होते.
परंतू चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होण्याआधीच सलमानने त्याचा मोर्चा मागे वळवला आहे. सलमानच्या निर्णयामुळे चाहत्यांकडून नाराजीचा सूर उमटत आहे. स्पॉटबॉयच्या माहितीनुसार सलमानने 'इंशाअल्लाह' चित्रपटामधून माघार घेतली आहे.
'इंशाअल्लाह' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमानने संजय लिला भंसाळी यांना १२५ दिवस देण्याचे वचन केले होते. त्याचप्रमाणे सलमानने चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याची मागणी भंसाळींकडे केली होती.
त्यानंतर भंसाळींनी चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यास नकार दिला. कारण भंसाळींना एक चित्रपट पूर्ण करण्यासाठी ८ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणे शक्य नाही. सलमानच्या काही गोष्टी भंसाळींना आवडल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी हा चित्रपट साकारण्यास नकार दिला आहे.
परंतू सलमान सध्या त्याच्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे त्याला 'इंशाअल्लाह' चित्रपटासाठी पुरेसा वेळ देता येणार नसल्यामुळे त्याने चित्रपटातून माघार घेतली आहे. आता सलमान-आलिया कधी एकत्र स्क्रिन शेअर करतील याची मात्र चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे.