सलमान लवकरच होणार बाप ?

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सतत काही ना काही कारणास्तव चर्चेत असतो.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 26, 2017, 03:28 PM IST
सलमान लवकरच होणार बाप ? title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सतत काही ना काही कारणास्तव चर्चेत असतो. आतापर्यंत सलमानची अनेक अफेअर्स झाली असतील. पण त्याचं कोणतंच नातं अधिक काळ टिकू शकलं नाही. त्याच्या लग्नाची चिंता आणि उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे. सलमानला लग्नाबद्दल विचारले असता तो नेहमी थातुरमातुर उत्तरे देऊन वेळ मारून नेतो. यावेळेस देखील त्याने लग्नाबद्दल काही न बोलता तो २-३ वर्षात बाप होईल, असे सांगितले. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमानने एका मुलाखतीत असे सांगितले. सलमान बोलला की, त्याचे वय आता ५० वर्ष असून त्याच्या आई-वडीलांना नातवंड पाहण्याची इच्छा आहे. यापूर्वी देखील बॉलिवूड मधील अनेक सेलिब्रिटींनी लग्न न करता पालकत्व स्विकारले आहे. यात चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता तुषार कपूर, अभिनेत्री सुश्मिता सेन यांच्या नावांचा सहभाग आहे. 

सलमानच्या चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास त्याचा आगामी चित्रपट 'टाइगर जिंदा है' प्रदर्शनाच्या वाटेवर असून त्यात कतरिना कैफ प्रमुख भूमिकेत आहे.