मुंबई : साउथ की क्वीन सामंथा रुथ प्रभु पुन्हा एकदा चर्चेचा भाग बनली आहे. नागा चैतन्य आणि समंथा वेगळे झाले आहेत. समंथा आणि नागा यांच्या विभक्त झाल्याची बातमी कळल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला. दोघंही आता वेगळे झाले असून आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत. नागा चैतन्य पुन्हा एकदा चर्चेचा भाग बनला आहे.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर तो अभिनेत्री शोभिता धुलिपालाला डेट करत आहे. नागाच्या डेटींगची बातमी समोर येताच अभिनेत्याचे चाहते सामंथावर संतापले. ही सगळी कहाणी तिच्या पीआर टीमने रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सामंथावर संतापलेल्यांना अभिनेत्रीने त्यांना चांगलच फटकारलं आहे.
नागा चैतन्य आणि शोभिता डेट करत असल्याची बातमी सोमवारी समोर आली. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर दोघंही सध्या एकत्र वेळ घालवत आहेत. एवढंच नाही तर शोभिता अभिनेत्याच्या घरीही स्पॉट झाली होती. समंथा विभक्त झाल्यानंतर आता नागाचं नाव शोभितासोबत जोडलं गेलं आहे. या सगळ्या अफव सामथांच्या पीआर टीमने पसरवल्या असं नागाच्या चाहत्यांनी म्हटलं.
सामंथाला ट्रोलर्सचा राग
समंथाने सत्य सांगणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. तिने ट्विट करून लोकांची तोंड बंद केली आहेत. सामंथाने ट्विट केलं, जर मुलींबद्दल अफवा असेल, तर ती खरी असू शकते. जर मुलांबद्दल अफवा असेल तर एखाद्या मुलीने त्याची योजना केली आहे. कृपया मोठे व्हा. येथे ज्या लोकांबद्दल बोललं जात आहे ते पुढे गेले आहेत आणि तुम्हीही पुढे जावं. आपल्या कामावर आणि कुटुंबाकडे लक्ष द्या. पुढे जा
Rumours on girl - Must be true !!
Rumours on boy - Planted by girl !!
Grow up guys ..
Parties involved have clearly moved on .. you should move on too !! Concentrate on your work … on your families .. move on!! https://t.co/6dbj3S5TJ6— Samantha (@Samanthaprabhu2) June 21, 2022
समंथा आणि नागा यांनी 2021 मध्ये त्यांचे लग्न संपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या विभक्त झाल्याची माहिती देण्याआधीच त्यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. विभक्त झाल्यानंतर समंथा आणि नागा त्यांच्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करत आहेत. हे दोघं सध्या अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.