सारा अली खानचा बॉक्सिंग व्हिडिओ व्हायरल

'कुली नंबर 1' चा रिमेक 

Updated: Oct 20, 2019, 11:10 AM IST
सारा अली खानचा बॉक्सिंग व्हिडिओ व्हायरल  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सारा अली खानने इंस्टाग्रामवर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सारा बॉक्सिंग करताना दिसत आहे. साराने शनिवारी हा व्हिडिओ शेअर केला असून तिच्या या व्हिडिओला सर्वाधिक पसंती मिळत आहे. 

व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिलं आहे, इट्स द विकेंड टाइम फॉर मॉर काइंड ऑफ पंच... हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी बघून हा व्हिडिओ जबरदस्त असल्याचं म्हटलंय. सगळीकडून खूप कौतुक होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

It’s the weekend... time for my kind of punch @pumaindia @dr.siddhant.bhargava

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

सारा अली खानने 'सिंबा' हा सिनेमा रणवीर सिंहसोबत केला. आता तिचे आणखी दोन सिनेमे रिलीज होणार आहेत. 'कुली नंबर 1' सिनेमात वरूण धवनसोबत दिसणार आहे. 1 मे 2020 रोजी रिलीज होणार आहे. 

डेविड धवन यांच दिग्दर्शन असलेला गोविंदा आणि करिश्माचा सिनेमा 'कुली नंबर 1' याचा हा रिमेक आहे. 24 वर्षानंतर या सिनेमाचा रिमेक येणार असून वरूण आणि सारा ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.