अंधाऱ्या रात्री एकटीच शॉपिंग करताना दिसली अभिनेत्री, मंकी कॅपने चेहरा लपवलेली ही आहे तरी कोण?

एका अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ही अभिनेत्री मंकी कॅपने चेहरा पूर्णपणे लपवून रात्रीच्या अंधारात निर्जन रस्त्यावर शॉपिंग करताना दिसली. तुम्ही ओळखलं का हिला?

नेहा चौधरी | Updated: Oct 30, 2024, 09:59 AM IST
अंधाऱ्या रात्री एकटीच शॉपिंग करताना दिसली अभिनेत्री, मंकी कॅपने चेहरा लपवलेली ही आहे तरी कोण? title=

बॉलिवूड सेलिब्रिटींना सार्वजनिक ठिकाणी खाजगी आयुष्य नसतं. ते जिथे जातात तिथे काही सेकंदात चाहत्यांची गर्दी होत असते. या सेलिब्रिटींनाही भारतात फिरायला खूप आवडतं. अशावेळी त्या शहरात फिरण्याचा आनंद लुटण्यासाठी हे सेलिब्रिटी आपले चेहरे लपवताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ती अभिनेत्री अंधाऱ्या रात्री एकटीच शॉपिंग करताना दिसत आहे. तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं तर...थांबा हा व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला कळेल. तर या अभिनेत्रीने मंकी कॅपने आपला चेहरा लपवला होता. त्यानंतर मस्त बिनधास्त ती फिरताना दिसतंय. तिच्या या अतरंगीपणाला चाहत्यांनी भरभरून कौतुक केलंय. पण आम्हाला सांगा तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलं का? 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. ही अभिनेत्री थंडीच्या ठिकाणी जाड विंटर जॅकेट आणि चेहऱ्यावर मंकी कॅप घालून रात्री उशिरा एका दुकानात शॉपिंग करताना दिसली. त्या दुकानात ती महाकाय टोपी डोक्यात घालून पाहत आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून 'केदारनाथ' अभिनेत्री सारा अली खान आहे. सारा अली खान सध्या तिच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून 'केदारनाथ'ला फिरतंय. ज्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

व्हिडीओशिवाय भोलेनाथच्या दर्शनासाठी केदारनाथ, उत्तराखंडमध्ये पोहोचलेल्या सारा अली खानने इतरही अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ती डोक्यावर स्कार्फ बांधून मंदिराबाहेर तर दुसऱ्या फोटोत ती डोंगरात मजा करताना दिसत आहे. अनेक फोटोंमध्ये अभिनेत्री देवाच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसत आहे.

फोटो शेअर करताना सारा अली खानने इंस्टाग्राम कॅप्शनमध्ये लिहिलं की, "जय श्री केदार, मंदाकिनीचा प्रवाह, आरतीचा आवाज... पुढच्या वेळी लवकरच भेटू, तोपर्यंत 'जय भोलेनाथ'. सारा अली खानचे हे फोटो पण चाहत्यांना खूप आवडतात. सारा अली खानला केदारनाथचे विशेष आकर्षण आहे. ती अनेक वेळा केदारनाथला जात असते.