मुंबई : विकी कौशल सध्या त्याच्या आगामी सरदार उधम सिंग या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. चित्रपटाच्या टीझरनंतर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे आणि आता चित्रपटाची रिलीज डेटही उघड झाली आहे. ट्रेलर लाँचच्या निमित्ताने विकी कौशलने चित्रपटाशी संबंधित काही किस्सेही शेअर केले. ज्यावरून दिसून आलं की, विकी कौशलने या चित्रपटासाठी किती मेहनत घेतली आहे. विशेषत: जेव्हा चित्रपट सुरू होण्यापूर्वी विकीच्या चेहऱ्यावर 13 टाके घालण्यात आले होते.
टाके घालण्यात आले होते
विक्की कौशलने ट्रेलर लाँचमध्ये सांगितलं की, चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार होतं. पण 4 दिवसांपूर्वी काही अपघातामुळे त्याच्या चेहऱ्यावर 13 टाके पडले. जेव्हा चित्रपटाच्या दिग्दर्शकाला हे कळलं तेव्हा ते हसले आणि म्हणाले की, तु आहेस तसाच ये आपण तु आहेस तसच शूट करु. आणि हे शूट म्हणून पार पडलं. 4 दिवसांनंतर, विकी चित्रपटाच्या सेटवर पोहोचला आणि टाके घालून शूट केलं. बाहेर आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विकीच्या डोळ्याखाली काही डाग दिसत आहेत. तेच हे टाके आहेत.
यामुळे मला अनेक रात्री झोप लागली नाही
विकी कौशलनेही त्याच कार्यक्रमात सांगितलं की, हा चित्रपट करत असताना तो अनेक रात्री झोपला नाही कारण तो खेळत असलेलं आयुष्य प्रत्यक्षात एका व्यक्तीने जगले होता आणि ते खूप कठीण होतं. विकी कौशलने सरदार उधम सिंगची भूमिका साकारली होती. ज्याने लंडनला जाऊन जनरल डायरचा खून केला होता. हा चित्रपट त्याच्या संपूर्ण जीवनावर आधारित आहे. ज्याचा नेत्रदीपक ट्रेलरही गुरुवारी रिलीज झाला आहे.