मुंबई : काही वर्षांपूर्वी कलाविश्वात #MeToo बराच ट्रेंडमध्ये आला होता. आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तनाची, विनयभंगाची विदारक कहाणी अनेक महिलांनी समाजापुढे आणली. यामध्ये अभिनेत्री काही धक्कादायक प्रसंगांना वाचा फोडण्यात पुढे होत्या.
लोकप्रिय मालिका, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'नं अनेकांनाच नवी ओळख दिली. कलाकारांच्या यादीतील एक असंच नाव आहे, ते म्हणजे अभिनेत्री मुनमून दत्ता.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मुनमूननं 2017 मध्ये तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराला वाचा फोडली होती.
तिनं पोस्टमध्ये काय लिहिलं?
'मी आश्चर्यचकित आहे, की काही चांगले पुरुष जाहीरपणे पुढे येत आपल्यावर झालेल्या अत्याचारांना वाचा फोडणाऱ्या महिलांची संध्या पाहून थक्क झाले आहेत. हे सर्वाकाही तुमच्याच घरा, तुमच्या मुलीसोबत, आईसोबत, बहीण आणि पत्नीसोबत, इतकंच नव्हे तर तुमच्या मोलकरणीसोबतही घडत होतं. त्यांना विश्वासात घ्या आणि विचारपूस करा. तुम्ही त्यांच्या उत्तरांनी हैराण व्हाल.'
पुढे तिनं लिहिलं, असं काही लिहिताना माझ्या डोळ्यांत पाणी येतं. मी लहान असताना शेजारचे काका आणि इतरांच्या भेदक नजरांला मी घाबरत होते. या नजरा संधी पाहून मला पाहत आहेत, धमकावत आहेत असं वाटत होतं. वयात येताना आपल्याकडे पाहणाऱ्यांच्या नजरा बदलत होत्या हे मुनमून जाणत होती, त्याला घाबरत होती.
ज्यानं अंडरगार्मेंटमध्ये हात टाकलेला तो ट्यूशन टीचर, ज्याला राखी बांधली ते शिक्षक, मुलींना ओरडण्यासाठी ब्रा चा स्ट्रॅप ओडचो, त्यांच्या स्तनांवर मारतो, रेल्वे स्थानकालर जो तिला असाच स्पर्श करतो त्यांना घाबरत होते. हे सगळं कमी वयात जास्त अनुभवायला मिळतं कारण त्या वयात हे सारं इतरांना सांगण्याची भीती वाटत असते, हे तिनं स्पष्ट केलं होतं.
अनेकदा असे अनुभव सांगतना मनावर इतकं दडपण असतं की पुढे जी परिस्थिती उदभवते ती अतिशय चिंताजनक असते, त्याचे मानसिक परिणामही मोठे असतात असं तिनं पोस्टमधून मांडलं होतं. काही अनुभवांमुळे एका वळणावर तरुणी, महिला सबंध पुरुष जातीचाच तिरस्कार करु लागतात ही वस्तूस्थितीही तिनं इथे मांडली होती. आपल्या मनात असणाऱ्या या भावनांपासून पाठलाग सोडवण्यासाठी तिला अनेक वर्षांचा काळ लागला होता.
आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगांना मागे सारत आज मात्र कोणी दुरूनही आपल्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची खैर नाही अशा शब्दांत तिनं खंबीर भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं.