मुंबई : बॉलिवूडचा किंग अर्थातच अभिनेता शाहरूख खान अभिनयापासून दूर असला तरी तो सध्या नेटफ्लिक्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत असतो. आता देखील त्याच्या आगामी 'बेताल' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानच्या रेड चिलीज एण्टरटेनमेन्ट या बॅनरखाली हॉरर आणि थ्रिलर सीरिज साकारण्यात आली आहे. २४ मे रोजी ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. प्रेक्षकांना गुंतवणून ठेवणाऱ्या बेताल वेब सीरिजची कथा हॉरर आणि थ्रिलर या भयावह गोष्टींभोवती फिरताना चाहत्यांना अनुभवता येणार आहे.
How far would you go to battle the demons within? Our second web series, #Betaal, a horror-thriller, releases May 24, @NetflixIndia. @ItsViineetKumar @AahanaKumra #PatrickGraham @iamnm @RedChilliesEnt @gaurikhan @_GauravVerma @blumhouse #SKGlobal https://t.co/D9LSxtxU9L
— Shah Rukh Khan (@iamsrk) May 8, 2020
खुद्द, शाहरूख खानने सीरिजचा ट्रेलर त्याच्या सोशल मीडियावर पेस्ट केला आहे. सीरिजचे ट्रेलर पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये, 'राक्षसांसोबत युद्ध करायला तुम्ही करायला तुम्ही किती दूर जाल?' असं लिहिलं आहे. त्याचप्रमाणे आमची ही दुसरी वेब सीरिज असून २४ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा देखील त्याने या वेळी केली.
पॅट्रिक ग्राहम यांनी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. 'बेताल'मध्ये विनीत कुमार, अहाना कुमरा, सुचित्रा पिल्लई, जितेंद्र जोशी, मंजरी पुपला आणि सायना आनंद मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे या सीरिजचं शुटींग खासकरून मुंबई, लोणावळा, खंडाळा या ठिकाणी करण्यात आलं आहे.