मुंबई : प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे सोमवारी सकाळी चेंबूर येथील एका रुग्णालयात निधन झालं. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना किडनीच्या आजारांनी त्याचप्रकारे अनेक ते व्याधींनी ग्रासलं होतं. शिवाय त्यांना कोरोना विषाणूची देखील लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे कलाविश्वाला त्याचप्रमाणे चाहत्यांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळींनी शोक व्यक्त केला आहे. वाजिद खान यांच्या निधनामुळे बॉलिवूडने एक रत्न गमावला आहे.
Devastated with the news of the passing away of my brother Wajid of Sajid -Wajid fame. May Allah give strength to the family
Safe travels bro @wajidkhan7 you’ve gone too soon. It’s a huge loss to our fraternity. I’m shocked & broken .
Inna Lillahi wa inna ilayhi raji'un
— salim merchant (@salim_merchant) May 31, 2020
Terrible news. The one thing I will always remember is Wajid bhai's laugh. Always smiling. Gone too soon. My condolences to his family and everyone grieving. Rest in peace my friend. You are in my thoughts and prayers.@wajidkhan7
— PRIYANKA (@priyankachopra) May 31, 2020
T 3548 - Shocked at the passing of Wajid Khan .. a bright smiling talent passes away .. duas , prayers and in condolence
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 1, 2020
Am just not able to come to terms with this ! Shocking ! Good bye dear brother.. love you .. till we meet on the other side Prayers for your peaceful journey Wajidbhai pic.twitter.com/cb8E152J1X
— Shankar Mahadevan (@Shankar_Live) May 31, 2020
सांगायचं झालं तर गेल्या दोन महिन्यांमध्ये बॉलिवूडला बसलेला हा तिसरा मोठा धक्का आहे. सर्व प्रथम २९ एप्रिल रोजी अभिनेते इरफान खान यांनी या जगाचा निरोप घेतला. या घटनेला २४ तास उलटत नाही तर दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आली. तर आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी दिग्गज संगीतकार वाजिद खान यांनी अखेरचा श्वास घेतला.