म्हणून आमिरची लेक बॉयफ्रेंडला म्हणाली 'तु माझा आधार आहेस... '

नुपूर फिटनेस ट्रेनर असल्यामुळे तो कायम इराच्या फिटनेसची काळजी घेत असतो. 

Updated: Jun 1, 2021, 08:53 AM IST
म्हणून आमिरची लेक बॉयफ्रेंडला म्हणाली 'तु माझा आधार आहेस... ' title=

मुंबई : अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान अभिनेत्री नसली तरी तिच्या बद्दल चर्चा मात्र जोरदार रंगलेल्या असतात. रंगणाऱ्या  चर्चांना  कारण देखील तसचं आहे. इरा कायम  तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोटो  तर कधी व्हिडिओ पोस्ट करत असते. इराने पोस्ट केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान  व्हायरल होत असतात. आता देखील  इराने बॉयफ्रेंडसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. अनेक फोटोंना एकत्र करून तयार केलेला हा व्हिडिओ इराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. 

इराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असं कळतं की इरा आणि नुपूर कायम जास्तीत-जास्त वेळ एकमेकांसोबत व्यतीत करतात. इरा - नुपूर अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र असतात. शिवाय व्हेकेशनसाठी देखील दोघे बाहेर जातात. नुपूर फिटनेस ट्रेनर असल्यामुळे तो कायम इराच्या फिटनेसची काळजी घेत असतो.  त्यांचे  वर्कआऊटचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बॉयफ्रेंडसोबत व्हिडिओ शेअर करत इराने कॅप्शनमध्ये, 'तुचं माझा आधार आहेस... मी तुझ्यावर फार प्रेम करते... ' असं लिहिलं आहे. सध्या इराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  शिवाय त्यांच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेन्टचा वर्षाव  होत आहे. इरा आणि नुपूर कायम चाहत्यांना लव्ह गोल्स देत असतात.

कोण आहे नूपुर शिखारे ?
नूपुर शिखारे आमिर खानचा फिटनेस कोच आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या रिपोर्टनुसार लॉकडाऊनच्या काळात जेव्हा इराने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इरा आणि नूपुर यांच्यातील नातं फुललं. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र पसरू लागली.