मुंबई : रणबीर कपूरला इंडस्ट्रीत जवळपास 13 वर्षे झाली आहेत. या 13 वर्षांत रणबीरने सर्व प्रकारचे टप्पे पाहिले आहेत. त्याने संजू ते रॉकस्टार सारखे हिट चित्रपट दिले आहेत तसंच जग्गा जासूस ते बेशरम अशा फ्लॉप चित्रपटांचाही सामना केला आहे. रणबीरचे प्रोफेशनल जीवन जितकं मनोरंजक आहे तितकंच रणबीरचं वैयक्तिक आयुष्य देखील मनोरंजक आहे.
विशेषत: त्याच्या लव्ह लाईफबद्दल रणबीरची एक वेगळीच प्रतिमा तयार झाली आहे. त्याला कधी चीटर म्हटलं गेलं तर कधी त्याला कॅसानोव्हा ही पदवी दिली गेली. आता लग्नानंतर रणबीर यावर स्पष्टपणे बोलला आहे.
माझी बाजू ऐकली नाही
शमशेराच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या रणबीर कपूरने अलीकडेच त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंवर चर्चा केली. त्याला विचारण्यात आलं की, त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे त्याला नेहमीच जज केलं जातं का? यावर रणबीरचं उत्तर होतं की, तो एक अभिनेता आहे. त्यामुळे तो येथे फक्त अभिनय करण्यासाठी आलो आहे. आपली बाजू कोणाला ऐकायला आवडेल असं त्याला वाटलं नाही. त्यामुळे त्याचं लक्ष फक्त करिअरवर आहे.
त्यावेळी तिला कॅसानोव्हाचा पोस्टर बॉय बनवण्यात आल्याचं रणबीरने मान्य केलं होतं. पण लोकांच्या बोलण्याचं त्याला कधीच वाईट वाटलं नाही किंवा, त्याला कधी राग येत नाही. तो शांत राहतो आणि अभिनयावर आपलं लक्ष केंद्रित करतो.
शमशेरा, ब्रह्मास्त्रवर टिकलय रणबीरचं फ्यूचर
रणबीर बऱ्याच दिवसांनी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. 22 जुलै रोजी शमशेरा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ज्यामध्ये तो एका डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. चॉकलेट बॉयची भूमिका सोडून रणबीर पहिल्यांदाच अशा पात्रात दिसणार आहे. यानंतर ९ सप्टेंबरला ब्रह्मास्त्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी रणबीरने आपलं सर्वस्व दिलं आहे. त्यामुळे त्याला या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. त्याचबरोबर या दोन चित्रपटांवर रणबीरचं भवितव्य पणाला लागलं आहे.