मुंबई : टिकटॉक स्टार आणि बीजेपी नेता सोनाली फोगट (Sonali Phogat ) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) गोव्यात निधन झालं. सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे. सोनाली यांच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे अनेयक प्रश्न उपस्थितीत होत आहे.
सोनाली यांचं निधन झालं नसून, त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान सोनाली यांची मुलगी यशोदारा फोगटचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'आईला न्याय मिळायला हवा, चौकशी व्हायला हवी, गुन्हेगाराला शिक्षा व्हायला हवी...' असं यशोदारा व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
दरम्यान, सोनाली फोगट यांच्या मृत्यूविषयी नवनवीन खुलासे समोर येत आहेत काही सीसीटीव्ही फुटेजेस समोर येऊ लागले आहेत. सोनाली यांना गोव्यातील क्लब पार्टीमध्ये जबरदस्ती ड्रग्ज देतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.
हा व्हिडीओ सोनाली फोगट यांचा मृत्यू झाला त्या दिवशीचा म्हणजेच 22 ऑगस्टच्या रात्रीचा आहे. व्हिडीओमध्ये सोनाली यांचा पीए सुधीर सांगवन त्यांना जबदरस्ती ड्रिंक्स देत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
पोस्टमार्टम अहवालानंतर सोनाली फोगट यांचा मृत्यू सिंथेटिक दृगच्या अतिसेवनामुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे आता या व्हिडिओच्या समोर येण्याने या प्रकरणाला नवीन वळण लागलं आहे ..