शिर्डीमध्ये सोनू सूदनं सुरू केला ऊसाच्या रसाचा स्टॉल.. स्वतःच काढतोय रस..

व्हिडीओमध्ये सोनू एका जनरल स्टोअरवर ऊसाचा रस बनवताना दिसत आहे. आणि सोबतच त्याची मजेशीर कॉमेंट्रीही पाहायला मिळत आहे.

Updated: May 5, 2022, 03:15 PM IST
शिर्डीमध्ये सोनू सूदनं सुरू केला ऊसाच्या रसाचा स्टॉल.. स्वतःच काढतोय रस.. title=

मुंबईः कोरोना काळात लोकांचा देवदूत बनलेला अभिनेता सोनू सूद हा नेहमीच त्याच्या कामांमुळे चर्चेत असतो. कोरोना काळात लोकांना त्यांच्या गावी पोहचवण्यापासून आर्थिक मदत देण्यापर्यंत सोनूने सर्वकाही केलं त्यामुळे तो अचानक प्रकाशझोतात आला.

नुकताच सोनूने एक मजेशीर व्हिडीओ शेअर करून खूप मोठा संदेश दिला आहे.

व्हिडीओमध्ये सोनू एका जनरल स्टोअरवर ऊसाचा रस बनवताना दिसत आहे. आणि सोबतच त्याची मजेशीर कॉमेंट्रीही पाहायला मिळत आहे. लोकही त्याच्या आजबाजूला गर्दी करताना दिसत आहेत. सोनू सूद तिथे उपस्थित लोकांना उसाचा रस बनवायला शिकवत आहे तर, स्वतः उसाचा रस बनवत तो लोकांना ग्लास भरून देत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

तर झालं असं की, सोनू सूद नुकताच शिर्डीमध्ये आला होता. या भेटीत त्याने एका स्टोअरला भेट दिली. व्हिडिओमध्ये सोनू सूद साई कृष्णाच्या कोल्ड ड्रिंक्स आणि जनरल स्टोअरमध्ये उभा आहे. सोनू उसाचा रस बनवताना म्हणतोय, शिर्डीला आल्यावर सगळे सर्वजण आमची छान सेवा करतात. आज मी माझ्या भावाच्या दुकानात उसाचा रस पित आहे.

सोनू सूदने हा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शन लिहिलं आहे, कोणाला उसाचा रस हवा आहे? एका ग्लासवर एक ग्लास रस फ्री.
#supportsmallbusiness #shirdi.असं लिहित सोनू सूदने छोट्या व्यवसायांना पाठिंबा देण्याचे आवाहन केलंय