Sonu Sood : कोविड (Covide -19) काळात अनेकांसाठी देवदूत ठरलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. कोणाला मदत करण्यापासून ते नव्या चित्रपटापर्यंत प्रत्येक गोष सोनू सूद हा सोशल मीडियावर शेअर करत असतो. मात्र असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणं सोनू सूदला महागात पडलं आहे. सोनू सूदने ट्विटरवर (sonu sood twitter) शेअर केलेल्या व्हिडीओमुळे नवा वाद सुरु झाला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ चूकीचा असल्याचे म्हटले आहे.
13 डिसेंबर रोजी सोनू सूदने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शूट केलाय. चालत्या रेल्वेच्या दरवाजावर बसून त्याने हा व्हिडीओ शूट केला होता. व्हिडीओच्या बॅंकग्राऊंडला मुसाफिर हूं यारों हे गाणं सुरु होते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याला असे न करण्याच्या सूचना केल्या.
— sonu sood (@SonuSood) December 13, 2022
मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा आणि नवीन वर्ष साजरं करा
यानंतर रेल्वे पोलिसांनीसुद्धा सोनू सूदच्या कृतीवरुन त्याला उत्तर दिलं आहे. सोनू सूद, ट्रेनमध्ये फूटबोर्डवरुन प्रवास करणे हे चित्रपटांमध्ये मनोरंजनाचे साधन असू शकते, पण वास्तविक जीवनात नाही. सर्व सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा आणि नवीन वर्ष साजरं करा, असे रेल्वे पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
.@SonuSood travelling on the footboard may be a source of 'Entertainment' in movies, not real life! Let's follow all safety guidelines and ensure a 'Happy New Year' for all.
— GRP Mumbai (@grpmumbai) December 14, 2022
दरम्यान, कोरोना काळात सोनू सूदने अनेकांची मदत केली होती. यानंतर त्याला अनेक जण खरोखरचा हिरो मानू लागले. त्यानंतर सोनू सूद अक्षय कुमारसोबत सम्राट पृर्थ्वीराज चित्रपटात दिसला होता. मात्र हा चित्रपट फारशी कमाल दाखवू शकला नाही.