मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री मालविका मोहनन (Malavika Mohanan हिच्या नावे नुकत्याच एका वादाची ठिणगी पडली आहे. सध्या ती ठिणगी धुमसताना दिसतेय. मालविकानं तिचा फोटो मॉर्फ करत तो अश्लील पद्धतीनं वापरणाऱ्या एका प्रसिद्ध मीडिया हाऊसला धारेवर धरलं आहे.
मूळ फोटोचा वापर करत एक वेगळाच अश्लील फोटो तयार करण्यात आला आणि मालविकाचा संताप अनावर झाला.
सध्याच्या काळात बऱ्याचदा अनेक अभिनेत्रींच्या बोल्ड फोटोशी छेडछाड केली गेल्याचं तुम्हीही पाहिलं असेल. सध्या मालविकाही याचाच शिकार झाली आहे.
मालविकाचा फोटो मॉर्फ करत यामध्ये सर्व मर्यादा ओलांडल्याचं दाखवण्यात आलं आहे. ज्यामुळं तिलाही हादरा बसला आहे.
संतप्त मालविका काय म्हणाली?
मालविकानं एक ट्विट करत त्यामध्ये तिचा मूळ फोटोही जोडला आणि लिहिलं, 'काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या फोटोशूटचा फोटो कोणीतरी एडिट केला आणि त्याला अश्लील रुप दिलं. अनेकांनीच तो अश्लील फोटो व्हायरल केला'.
ट्विटमध्ये मालविकानं काही मोठ्या माध्यमांचंही नाव घेत अशा पत्रकारितेवर नाराजी व्यक्त केली.
तुमच्यापैकी कोणी हा अश्लील फोटो पाहिला तर त्याची माहिती द्या, असं आवाहन तिनं आपल्या पोस्टच्या माध्यमातून केलं.
मालविका मुळातच बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. बऱ्याचदा तिनं तिचे अनेक बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
कहर असा की, तिच्या फोटोला मॉर्फ करत त्याला अश्लील पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे, ज्यामुळं ती सध्या चांगलीच संतापली आहे.
फक्त मालविकाच नाही, तर आतापर्यंत बऱ्याच अभिनेत्रींचे असे फोटो व्हायरल करत त्यांचा चुकीच्या पद्धतींनी वापर केला गेला आहे. मुळात यामध्ये कुठेतरी माध्यमं आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि त्यांचा होणारा गैरवापरच कारणीभूत ठरत आहे, असं अनेकांचं मत.