मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाचा तीन दिवसीय सोहळा रंगणार आहे. 7, 8 आणि 9 डिसेंबरला दोघेही हिंदू आणि कॅथलिक रितीरिवाजांनी लग्नबंधनात अडकणार आहेत. सवाई माधोपूरचा 700 वर्ष जुना सिक्स सेन्स किल्ला बरवरा बुक करण्यात आला आहे. कतरिना कैफसाठी सोजत मेहंदी जोधपूरच्या पाली भागातून पाठवली जाईल. जगभरात सोजत हे मेहंदीसाठीचं खास स्थान आहे. ही मेहंदी कतरिनाला भेट म्हणून दिली जाणार आहे. (Special mehndi for katrina kaif marriage)
रिपोर्ट्सनुसार, विकी आणि कतरिनाच्या लग्नासाठी मेहंदीचा नमुना पास झाला आहे. सोजतचे कलाकार नैसर्गिकरित्या मेहंदी तयार करत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचे रसायन वापरले जाणार नाही. सोजत मेहंदी हाताने तयार करून कतरिनाला पाठवली जाईल. सोजतच्या मेहंदी विक्रेत्याच्या म्हणण्यानुसार, कतरिनाची मेहंदी 50 हजारांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत तयार होईल, परंतु व्यापारी त्यांच्याकडून एकही पैसा घेणार नाही.
रिपोर्ट्सनुसार दोघेही मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. यानंतर राजस्थानमध्ये भव्य लग्न होणार आहे. याशिवाय दोघांच्या लग्नात कोणालाही मोबाईल आणण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाहुण्यांसाठी हा कडक नियम ठेवण्यात आला आहे. दोघांनी एक एजन्सी नेमली आहे, ज्यांना कडक आदेश देण्यात आले आहेत की लग्नात कोणत्याही पाहुण्याने फोन आणू नये आणि कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ किंवा फोटो लीक करू नये.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विकी त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर कतरिनाने लग्नाची तयारी पूर्ण करण्यासाठी कामातून थोडा वेळ काढला आहे. विकीची आई आणि भाऊ सनी कौशल कतरिनाच्या तयारीत व्यस्त आहेत. लग्नानंतर कतरिना आणि विकी 'टायगर 3' आणि 'सॅम मानेकशॉ' बायोपिकमध्ये व्यस्त होणार आहेत.