वॉशिंग्टन : अमेरिकेतील मिशिगन ( MIshigan ) येथे राहणाऱ्या निकोलला ( Nikol ) लहानपणी खडू खायला आवडायचे. खडू मिळेनासे झाल्यावर आपली भूक भागविण्यासाठी ती चक्क भिंतीकडे वळली. हे व्यसन इतके वाढले की एका आठवड्यात 3 फुटांपर्यंत भिंत खाऊन ती फस्त करते.
निकोलची आईचे निधन झाले. त्यावेळी ती डिप्रेशनमध्ये गेली. याच काळात तिला खडू खाण्याची सवय लागली. बघता बघता ही सवय आता भिंत खाण्यापर्यंत पोहोचली. भिंतींमधील रंगरंगोटीतील रसायनांमुळे तिचे हे व्यसन वाढतच गेले.
निकोल हिचे हे व्यसन इतके वाढले की ती आता आठवड्यातून तीन चौरस फूट भिंत खाते. निकोलला एक मुलगा आहे. निकोल केवळ तिच्या घराच्या भिंतीच नाही तर शेजारी आणि नातेवाईकांच्या घरांच्या भिंतीदेखील खाते.
तिच्या या व्यसनामुळे तिचे शेजारी आणि नातेवाईक तिच्यावर प्रचंड नाराज आहेत. निकोलने हे व्यसन सोडण्याचा प्रयत्न केला. पण तिला यश आले नाही. या व्यसनामुळे तिला कर्करोगासारख्या गंभीर आजार होऊ शकतो असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. पण, अखेर व्यसन ते व्यसनच...