सोनी चॅनलवर सुरू होणार सुनील ग्रोव्हरचा नवा शो!

कपिल शर्माशी वाद झाल्यानंतर त्याच्यापासून तसेच 'द कपिल शर्मा' शोपासूनची दूर झालेला सुनील ग्रोव्हर छोट्या पडद्यावर पुन्हा येतोय.

Updated: Sep 15, 2017, 07:42 PM IST
सोनी चॅनलवर सुरू होणार सुनील ग्रोव्हरचा नवा शो!   title=

मुंबई : कपिल शर्माशी वाद झाल्यानंतर त्याच्यापासून तसेच 'द कपिल शर्मा' शोपासूनची दूर झालेला सुनील ग्रोव्हर छोट्या पडद्यावर पुन्हा येतोय.

सोनी चॅनलवर सुनीलचा नवा विनोदी कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. 

'द कपिल शो' बंद झाल्यानंतर सुदेश आणि कृष्णाचा 'द ड्रामा कंपनी' हा कार्यक्रम सुरू होता. पण या कार्यक्रमाने अपेक्षित टीआरपी न दिल्याने अखेर तो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
सप्टेंबर  महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुनीलचा नवा कार्यक्रम या जागी सुरू होईल. 

सुनील त्याच्या नव्या कार्यक्रमासाठी प्लॅनिंग करत अअहे. नवा कार्यक्रमाची थीम काय असेल ? तसेच इतर सिक्रेट्सही गुप्त ठेवण्यात आले आहेत.  
काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या 'ट्युबलाईट'च्या प्रमोशनसाठी एका खास कार्यक्रमात सहभागी झाला आहे.