मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने सर्वांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेली ही मालिक TRP लिस्टमध्ये कायम अव्वल असते. मालिकेच्या यशामागे संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. लेखक डायलॉग लिहितो पण त्यामध्ये प्राण आणण्याचं काम मात्र अभिनेत्यांचं असतं. मालिकेत बापूजी भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट यांनी वडिलांची भूमिका साकारण्यासाठी खऱ्या आयुष्यात अनेकदा टक्कल केलं.
मालिकेत चंपकलाल गढा ही वडिलांची भूमिका साकारण्यासाठी त्यांनी 280 वेळा टक्कल केलं. एका मुलाखतीत अमित भट्ट यांनी सांगितलं की, 'शुटिंगसाठी मी दर दोन ते तीन दिवसांनी टक्कल करायचो. सतत रेझर, ब्लेडचा वापर केल्यामुळे मला त्वचेची समस्या निर्माण झाली. त्यानंतर डॉक्टरांनी मला टक्कल न करण्याचा सल्ला दिला.'
दरम्यान, निर्मात्यांनी त्यांनी विग घालण्याचा सल्ला दिला. पण व्यक्तीरेखा आणि त्यामधील प्राण कायम ठेवण्यासाठी त्यांनी टोपी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता मालिकेमध्ये बापूजी आपल्याला टोपीत दिसतात. महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर ऐकाऐकी टोपीतले बापूजी सर्वांसमोर आले, पण प्रेक्षकांनी त्यांच्या या रूपाला देखील पसंती दिली.
चंपकलाल गढा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अमित भट यांनी कॉलेज जीवनापासूनच अभिनयाला सुरुवात केली. अनेक गाजलेल्या गुजराती नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे. नाटकात काम करत असताना त्यांना 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या गुजराती कादंबरीवर आधारित मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.