मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा लोकप्रिय शो बऱ्याच काळापासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील प्रत्येक पात्र लोकांना खूप आवडते. बालकलाकार देखील प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत.
या मालिकेतील काही कलाकारांनी मालिका जरी सोडली असली, तरी ते आजही त्यांच्या कामामुळे ओळखले जातात.
शोमध्ये आतापर्यंत दोन सोनू बदलल्या आहेत. पहिल्या सोनूचे नाव झील मेहता आणि दुसऱ्या सोनूचे नाव निधी भानुशाली आहे. अभिनेत्री निधी भानुशालीबद्दल तुम्ही खूप वाचलं असेल पण आता झील मेहता मालिका सोडल्यानंतर सध्या काय करतेय,याबाबत माहिती समोर आली आहे.
यापूर्वी सोनूची भूमिका साकारणाऱ्या झील मेहताला लोकांचे खूप प्रेम मिळाले होते. बालकलाकार म्हणून तिने आपलं वेगळे स्थान निर्माण केले. त्याचवेळी, अलीकडेच झील मेहताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सोनू म्हणजेच झील मेहताची ही पोस्ट पाहून आता तिने मेकअप आर्टिस्ट म्हणून काम सुरू केल्याचे दिसत आहे.तिची आई देखील एक मेकअप आर्टिस्ट आहे. मेकअप आर्टिस्ट असण्यासोबतच झील मेहता एका खाजगी ई-कॉमर्स कंपनीत सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत आहे.
शोमध्ये चार वर्षे काम केल्यानंतर सोनू म्हणजेच झील मेहताने शोला अलविदा केला होता आणि त्यामागे एक वैध कारण होते. खरं तर, त्या दिवसांत सोनूच्या दहावीच्या परीक्षा सुरु होणार होत्या आणि शोमुळे अभ्यास करणं सोपं नव्हतं, म्हणून तिने शोचा निरोप घेतला.